अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले!

वृत्तसंस्था | रायटर्स 

ब्रेनवृत्त | मेलबर्न


अदानी इंटरप्राइजेसने (Adani Enterprises) ऑस्ट्रेलियाच्या एका बंदर व्यवसायात बेसुमार व गैरवाजवी कृत्य केल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियातील व्यवसाय सल्लागार प्रतिनिधी असलेल्या ग्लास लेविसने (Glass Lewis) भागधारकांना जोखीम समितीवर अदानी इंटरप्राइजेसच्या सदस्याच्या विरोधात मतदान करण्याची शिफारस केली आहे.

अदानी इंटरप्राइजेसचे ऑस्ट्रेलियायी घटक असलेली ब्राऊस मायनिंग अँड रिसोर्सेस (Bravus Mining & Resources) ह्या कंपनीचा एका वादग्रस्त प्रकल्पात सहभाग आहे. या प्रकल्पांतर्गत, वैश्विक तापमान वाढीच्या चिंता कायम असताना सुद्धा भारतात औष्णिक कोळसा विकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड परिसरात कारमायकेल खाण (Carmichael mine) विकसित करण्यात येत आहे. 

छायाचित्र स्रोत : रायटर्स

वाचा । पेट्रोलियमच्या दर कपातीचा कोणताही प्रस्ताव नाही 

सोबतच, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड सर्वोच्च न्यायालयाने अदानी इंटरप्राइजेसाचे ऑस्ट्रेलियायी एकक मक्तेदारवादी व्यवसाय कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर ग्लास लेविसने इतर समभागधारकांना जोखीम समितीवर अदानीच्या  सदस्यांविरोधात मतदान करण्याची शिफारस केली आहे. 

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात क्वीन्सलँड सर्वोच्च न्यायालयाने अदानी मायनिंगच्या विरोधात तब्बल १०७ ऑस्ट्रेलियन डॉलर्स (८०.७ मिलियन डॉलर्स) दंडासह निकाल सुनावला होता.  यामुळे, अदानी इंटरप्राइजेसद्वारे संचालित ऑस्ट्रेलियातील अब्बोट पॉईंटच्या निर्यात टर्मिनलचा वापर करणाऱ्या इतर चार कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लागला होता.

“न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भानुसार, अदानी मायनिंगचे हे कृत्य व्यवसाय आणि जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट चित्र प्रदर्शित करते. विशेष म्हणजे, अदानी इंटरप्राइजेसला न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी आपत्कालीन तत्त्वावर अदानी मायनिंगला निधी पुरवावा लागणार आहे. हे भागधारकांसाठी अतिशय धोक्याची बाब आहे”, असे ग्लास लेविसने म्हटले. दरम्यान या प्रकरणावर अदानीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा । प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड

ग्लास लेविस अदानी इंटरप्राइजेसला मानांकन देताना स्पष्ट करते – पर्यावरणीय, सामाजिक व कारभार (ESG) या घटकांच्या प्रभावामुळे अदानीवर भौतिक आर्थिकदृष्ट्या ‘गंभीर’ धोका ओढावला आहे.  ग्लास लेविस म्हणते, “वैश्विक पातळीवर लोकप्रिय नसलेल्या कारमायकेल खाणीशी संबंधित प्रक्रियांमध्ये असलेल्या जोखीमांकडे अदानी इंटरप्राइजेसचे मंडळ कशाप्रकारे बघते, यावर भागधारकांचे भविष्य अवलंबून आहे. हे प्रकरण भागधारकांसाठी चिंतेची बाब असल्याचे आम्हाला वाटते.” 

दरम्यान, इंटरप्राइजेसच्या जोखीम व्यवस्थापन समितीवर पुनर्नियुक्त होण्यासाठी उभे असलेल्या प्रणव अदानी यांच्या विरोधात मत देण्याचा सल्ला ग्रास लेविसने भागधारकांना दिला आहे. जोखीम समितीचे सदस्य असताना प्रणव यांना समितीतील इतर भागधारक सदस्यांच्या संदर्भात आपली भूमिका पार पाडण्यात अपयश आले, असा इतर समभागधारकांचा दावा आहे. 

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

 

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

 

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: