राष्ट्रपतींनी स्वीकारले १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचे राजीनामे आज (बुधवारी) स्वीकारले आहेत. विद्यमान मंत्रिमंडळातील माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद, माहिती व प्रसारण तसेच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा यात समावेश आहे. 

देशाच्या राष्ट्रपती भवनातून प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रपतींनी १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विद्यमान मंत्रिमंडळातील कित्येक वरिष्ठ व महत्त्वाच्या पदावरील नेत्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सादर केले.

राष्ट्रपतींनी स्वीकारलेल्या या राजीनाम्यांमध्ये डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, रवी शंकर प्रसाद, रमेश पोखरीयाल ‘निशंक’, संतोषकुमार गंगवार, थावरचंद गेहलोत व इतर मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा समावेश आहे. संबंधित मंत्र्यांचे संपूर्ण यादी खालीलप्रकारे आहे.

वाचा । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!

> राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची यादी 

  1. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद
  2. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर 
  3. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन 
  4. शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ 
  5. डीव्ही सदानंद गौडा
  6. संतोषकुमार गंगवार
  7. थावरचंद गेहलोत
  8. बाबुल सुप्रियो
  9. संजय शामराव धोत्रे
  10. रतनलाल कटारिया
  11. प्रतापचंद्र सारंगी, आणि 
  12. देबाश्री चौधरी  

दुसरीकडे, केंद्र शासनाने मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय घेतला असून, नव्या मंत्रिमंडळात ४३ नवीन मंत्र्यांचा समावेश होणार आहे. ह्या सर्व मंत्र्यांचा शपथविधी आजच राष्ट्रपती भवनात होणार आहे. त्यानंतरच कळेल, की नेमके कुणाला कोणते मंत्रालय मिळाले आणि किती चेहरे नवीन आले. दरम्यान, राजीनामा दिलेल्या वरील मंत्र्यांची नवीन शपथविधी कार्यक्रमातही उपस्थिती आहे.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

 

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: