मोदी २.० पुनर्रचित मंत्रिमंडळ : कुणाला काय मिळाले?

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात काल झालेल्या पुनर्रचनेत सर्बानंद सोनोवाल, नारायण राणे आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना कॅबिनेट मंत्रीचे पद देण्यात आले. तर जुन्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांवर असलेले आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञान व कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह १२ मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कालच स्वीकारले

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये काल संध्याकाळी उशिरा झालेल्या शपथविधी सोहळ्यात काही नवीन चेहर्‍यांसह 15 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यांपैकी १३ मंत्र्यांनी हिंदीमध्ये, तर दोन मंत्र्यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (वय ६९ वर्षे) यांनी सर्वप्रथम इंग्रजीतून शपथ घेतली. राणे यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रीचे पद देण्यात आले आहे. 

राणे यांच्यानंतर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. 58 वर्षीय सोनोवाल यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच क्रीडा व युवक कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ घेतली. 50 वर्षीय सिंधिया पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) शासनकाळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय वाणिज्य व दळणवळण राज्यमंत्री होते. सिंधिया यांना नागरी उड्डाणमंत्रीपद देण्यात आले आहे.

वाचा । राष्ट्रपतींनी स्वीकारले १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे!

मध्य प्रदेशातील टीकमगडचे लोकसभेचे खासदार वीरेंद्र कुमार, ओडिशाचे राज्यसभा खासदार अश्विनी वैष्णव, बिहारचे राज्यसभेचे खासदार जेडी (यू) नेते आर सी पी सिंह, बिहारचे हाजीपूरचे लोकसभा खासदार पशुपती कुमार पारस यांनीही काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २८ मंत्र्यांना राज्य मंत्रिपदाचा प्रभार देण्यात आला आहे, ज्यांमध्ये मीनाक्षी लेखी, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, शोभा करंडलाजे यांना स्थान देण्यात आले आहे.

> कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी

* नारायण तातू राणे

* सर्बानंद सोनोवाल

* डॉ वीरेंद्र कुमार

* ज्योतिरादित्य सिंधिया

* रामचंद्र प्रसाद सिंह

* अश्विनी वैष्णव

* पशुपति कुमार पारस

* भूपेंद्र यादव

* किरण रिजिजू

* हरदीपसिंग पुरी

* मनसुख मांडवीया

* राज कुमार सिंह

* परषोत्तम रुपाला

* जी किशन रेड्डी

* अनुराग ठाकूर

हेही वाचा । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!

> संपूर्ण यादी :  कुणाला कोणते मंत्रीपद मिळाले? 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: