न्यायालयाने फेटाळली पाचऐवजी तीन दिवसांच्या सुनावणीची मागणी
अयोध्या प्रकरणी आठवड्यातील पाच दिवस नियमित सुनावणी करण्याऐवजी ती तीन दिवस करण्यात यावी, अशी वकील राजीव धवन यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अयोध्या खटल्याप्रकरणी आठवड्यातील पाच दिवसांऐवजी तीन दिवस सुनावणी करण्याची मुस्लिम पक्षकारांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आठवड्यातील पाच दिवस करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही सुनावणी पाचऐवजी तीनच दिवस घेण्याची मागणी मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी केली होती.
बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालापर्यंत न्यायाधीशांची निवृत्ती नाही?
वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच दिवसांच्या सुनावणीच्या निर्णयाला विरोध करत म्हटले की, “खटल्याची तयारी करण्यास यामुळे पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे ही सुनावणी आठवड्यातून तीनच दिवस व्हावी.” यावर तेव्हा न्यायालयाने म्हटले की, “सुनावणी पाच दिवसच होईल. परंतु, जेव्हा उलटतपासणीच्या वेळी तुम्हाला तसा स्वतंत्र वेळ दिला जाईल अथवा सुनावणीत ब्रेक घेतला जाईल.”
राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा
सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सुरु असलेली सुनावणी आता आठवड्यातून पाच दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालय आठवड्यातून फक्त तीन दिवसच या प्रकरणाची होणार होती. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत आठवड्यातील उर्वरित दोन दिवस म्हणजे सोमवार आणि शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
◆◆◆