‘रेमडेसिवीर’साठी तीन भारतीय कंपन्यांचा ‘परवाना करार’
भारतातील तीन कंपन्यांनी कोरोना विषाणूवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर‘ औषधाच्या उत्पादनासाठी अमेरिकी कंपनीशी करार केला आहे. केवळ अमेरिकाच आणि भारतच नव्हे, तर जगातील तब्बल १२७ देशांसाठी हा करार आहे.
ब्रेनविश्लेषण | रेमडेसिवीर परवाना करार
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. तर दुसरीकडे, भारतामध्ये या महामारीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतातील तीन प्रमुख औषधनिर्माण कंपन्यांनी कोरोना विषाणूवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर‘ औषधाच्या उत्पादनासाठी अमेरिकी कंपनीशी करार केला आहे. विशेष म्हणजे, केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगातील तब्बल १२७ देशांसाठी हा करार असून, नोएडामधील कंपनी या औषधीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे.
अमेरिकेने ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनाच्या रूग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या ‘अन्न व औषध प्रशासना‘नेही ‘गिलियड सायन्सेस’ला (Gilead Sciences) ‘कोव्हिड-१९’च्या उपचारासाठी रेमडेसिवीर औषध वापरण्याची परवानगी नुकतीच काही दिवसांपूर्वी देण्यात आली. या निर्णयास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दुजोरा दिला होता. दरम्यान, आता हे औषध भारतीय बाजारात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होत असून, तसे प्रयत्न सुरू झाले आहेत.
भारतातील ज्युबिलंट लाइफ सायन्स, हेटरो आणि सिप्ला या तिन्ही कंपन्यांनी अमेरिकेच्या ‘गिलीड सायन्सेस‘ या औषधनिर्माण कंपनीशी ‘रेमिडीसीवीर’ औषधाचे उत्पादन करण्याचा करार केला आहे. विशेष म्हणजे, केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगातील तब्बल १२७ देशांसाठी हा करार असून नोएडामधील कंपनी या औषधासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, भारतीय औषध कंपन्यांही केलेल्या या करारांतर्गत काही महत्त्वाच्या बाबीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
१) भारतीय कंपनी ठरवणार किंमत
या करारांतर्गत गिलीड कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रेमडेसीवीर’चे उत्पादन जलद गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी या परवाना कराराअंतर्गत (लाइसेंसिंग ऍग्रीमेंट) सहभागी कंपन्यांना गिलियड कंपनीकडून रेमडेसीवीर बनविण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा हक्क असेल. तसेच, ज्या कंपन्या जेनेरिक उत्पादने तयार करतील त्या कंपन्यांना किंमत निश्चित करण्याचाही अधिकार असेल.
२) कंपन्यांना होणार मोठा फायदा
‘जागतिक आरोग्य संघटना‘ (WHO) जोपर्यंत ‘कोविड – १९’ या जागतिक महामारीचा शेवट जाहीर करत नाही, तोपर्यंत हे परवाने रॉयल्टीमुक्त असतील. तसेच, कोरोना साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी रेमडेसिवीरऐवजी इतर कोणतीही लस मिळत नाही किंवा दुसरे कोणते औषध मंजूर होत नाही, तोपर्यंत हे परवाने रॉयल्टीमुक्त असतील.
हेही वाचा : ‘रेमडेसिवीर’ ठरले ‘कोव्हिड-१९’वरील एकमेव मान्यताप्राप्त औषध!
३) देशातील किंमत कमी करण्यावर भर
कोरोना विषाणूवर जगात आतापर्यंत कोणतीही लस किंवा औषध बनविलेले नाही. यामुळे, ‘रेमडेसिवीर’बद्दल संपूर्ण जगात उत्सुकता आहे आणि यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये जिंकण्याची आशा वाढत आहे. ज्युबिलंट लाइफ सायन्सेसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी एस. भारतिया यांच्या मते, ‘प्रयोगशाळेतील (क्लिनिकल) चाचण्या आणि औषधाच्या नियामक मंजुरींवर बारीक लक्ष ठेवले जाईल आणि मान्यता मिळाल्यानंतर लवकरच औषध उत्पादन सुरू होईल. त्याचबरोबर औषधाची किंमत कमी करण्यासाठी आणि औषध निरंतर उपलब्ध राहण्यासाठी देशातच औषधांचा सक्रिय औषधी घटक (एपीआय) तयार करण्याचे नियोजन आहे.’
दरम्यान, आपत्कालीन उपयोग प्राधिकरणाने (Emergency Usage Administration) रूग्णालयात दाखल केलेल्या कोरोनाच्या गंभीर रूग्णांना हे औषध देण्याची परवानगी दिली आहे. प्राधिकरणाने दोन जागतिक क्लिनिकल चाचण्यांवरील माहितीच्या आधारे ही परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीज कंट्रोल’ येथे कोरोना विषाणूग्रस्त गंभीर रुग्णांवर या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
◆◆◆