अमेरिकेत ‘एच-१बी’ व्हिसावर २०२० अखेरपर्यंत बंदी !
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर उद्यापासून (ता. 24) ‘एच-वन बी’ (H-1B) व्हिसावर डिसेंबर, 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालण्याची घोषणा केली. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अमेरिकेतील लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे, भविष्यात अमेरिकेत नोकरीसाठी अमेरिकी लोकांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगत ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतासह इतर देशातील माहिती तंत्रज्ञान विषयातील उच्च शिक्षित (आयटी प्रोफेशनल) लोक ‘H-1B’ व्हिसावर अमेरिकेत नोकरी करण्यासाठी जात असतात. मात्र, अमेरिका प्रशासनाने H-1B व्हिसावर निर्बंध घातल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मोठा झटका बसलाय. तर दुसरीकडे, याचा फटका भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनानाही बसणार आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
‘कोव्हिड-१९’मुळे ट्रम्प प्रशासनाला अमेरिकेतील विरोधी पक्षाने घरात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसावर निर्बंध आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासह अन्य अनेक श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध आणले आहेत.
दरम्यान, एका अहवालानुसार अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण 3 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 3 कोटी अमेरिकी लोकांनी आपला गमावला आहे. रोजगार गमावल्यामुळे अमेरिकेत बेरोजगारी भत्ता मिळविण्यासाठी तेथे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.