कोरोना काळातही ‘योग आशेचा किरण’ आहे : पंतप्रधान मोदी
वृत्तसंस्था । पीटीआय
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
एकीकडे जग कोरोनाच्या महासाथरोगाशी लढत असताना योग ‘आशेचा एक किरण’ बनून आहे आणि या संकटाच्या काळातही ते आंतरिक शक्तीचे स्त्रोत म्हणून कायम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ७ व्या आंतरराष्ट्रीय योग्य दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संबोधित करताना म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने भारताने अजून एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, लवकरच जग एम-योग (m-yoga) अनुप्रयोगाच्या शक्तीपासून अवगत होणार आहे. एम-योग अनुप्रयोगात (अप्लिकेशन) सामायिक योग नियमांवर (कॉमन योगा प्रोटोकॉल) आधारित योग प्रशिक्षणाच्या अनेक चित्रफीती उपलब्ध असतील. जगभरातील विविध भाषांमध्ये ह्या चित्रफिती (व्हिडीओज) असणार आहेत. यामुळे ‘एक जग, एक आरोग्य’ या उद्दिष्टाला पूर्ण करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
ब्रेनविशेष । आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’
मोदी म्हणाले, “ज्यावेळी संपूर्ण जग कोरोना विषाणू आजाराशी अव्याहतपणे लढत आहे, त्याचवेळी योग एक आशेचा किरण बनून आहे.” सोबतच, पंतप्रधान असेही म्हणाले, की जरी गेल्या दीडेक वर्षांत जगभर व भारतातही हा दिन व्यापक प्रमाणात साजरा होत नसला, तरी या दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. जगभरातील बहुतांश देशांसाठी योग दिवस हा त्यांचा पुरातन सांस्कृतिक सण नाही आणि सद्याच्या संकटाच्या काळात लोक कदाचित त्यास विसरले असतील आणि दुर्लक्ष करत असतील, पण दुसरीकडे योगबद्दलच्या लोकांच्या उत्साहात वाढ झाली आहे.
पुढे पंतप्रधान असेही म्हणाले, की आता बहुतांश शाळांची त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु केले असून, त्यांची सुरूवात प्राणायाम सारख्या योगाच्या व्यायामांनी होते. यामुळे मुले कोव्हिड-१९ विरुद्ध लढण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.
Subscribe on Telegram @marathibrainin
अशीच विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.