चांगल्या हिंदूंना राम मंदिर नकोय : शशी थरूर

राम मंदिर प्रकरण संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांचे वादग्रस्त विधान. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 

वृत्तसंस्था,

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर

‘कोणत्याही खऱ्या हिंदूला दुसऱ्याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे असे वाटणार नाही. त्यामुळे कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे’, असे विधान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राम मंदिरसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. कोणत्याही खऱ्या हिंदूला एखाद्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे. हिंदू लोक अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही खऱ्या हिंदू माणसाला दुसऱ्याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे वाटणार नाही, असे शशी थरूर म्हणाले. चेन्नईत आयोजित ”द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018” या कार्यक्रमात ते बोलत होते.

थरूर यांच्या विधानानंतर भाजपनेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये, यासाठी काँग्रेस नेते असे वादग्रस्त विधान करतात, असे भाजपचे म्हणणे आहे. अशा विधानांतून ते जाणूनबुजून, अयोध्येत राममंदिर होऊ नये म्हणून एका विशिष्ट समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते नरसिंहा यांनी केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांनी शशी थरूर यांच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर विश्व हिंदू परिदषेचे सुरेंद्र जैन यांनी टीका केली आहे.

शशी थरूर यांचे ‘द पॅराडॉक्सियल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी वापरलेल्या आणि वाचकाला बुचकळ्यात टाकणाऱ्या काही अतिलांबलचक इंग्रजी शब्दांमुळे सध्या ते सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहेत.

◆◆◆

 

विविधांगी माहिती आणि बातम्यांसाठी आमच्याशी जुळून राहा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब आणि टेलिग्रामवर. 

लिहा : writeto@marathibrain.com ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: