अभिजित बांगर नागपूरचे नवे आयुक्त

प्रतिनिधी

नागपूर, १४ नोव्हेंबर

नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदी राज्य शासनाने काल अभिजित बांगर यांची नियुक्ती केली. सोबतच चार आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली.

अभिजित।बांगर यांची नागपूर मनपा आयुक्तपदी बदली

नागपूर मनपात नियुक्त होण्याआधी बांगर हे अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. बांगर यांच्यानंतर अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख हे आता अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

बांगर यांच्याआधी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर वीरेंद्र सिंह कार्यरत होते. आता त्यांची बदली राज्याच्या कौशल्य विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्याचे अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे, तर हिंगोलीचे विद्यमान अनिल भंडारी हे अकोल्याच्या महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: