काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांचा या आठवड्यात राजीनामा?
भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आठवड्यात राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
ब्रेनवृत्त | सोलापूर
१८ जुलै २०१९
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केेलेल्या गौप्यस्फोटानंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्कात असलेल्या आमदारांमधून काहीजण या आठवड्यात राजीनामा देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सोलापूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनास गेल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार संपर्कात असून, त्यातले काही जण लवकरच राजीनामा देणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सार्वजनिक निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचला आहे, त्यामुळे अनेकांनी राजीनामे दिले आहेत. वरीष्ठ नेत्यांनीच राजीनामे दिल्यावर खालचे लोक काय करणार, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. तुळजाभवानी आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या पाटलांनी सोलापूरतल्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संबंधित गौप्यस्फोट केला.
पूढे बोलताना चंद्रकांत पाटील असेही म्हणाले की, 1984 साली भाजप फक्त दोन जागांवर निवडून आला होता, मात्र खचून न जाता आम्ही पक्ष वाढवला, त्यामुळे आज आमचे 303 खासदार निवडणूक आले आहेत.
मात्र राजीनामा देणाऱ्या आमदारांची नावे त्यांनी उघड केली नाहीत. “संपूर्ण देश भाजपमय होत असून, नाव न विचारणाच्या अटीवर विचारलात तर सोलापुरातीलही काहीजण संपर्कात आहे. मात्र, नाव आताच जाहीर करण्यात मजा नाही”, असेही ते म्हणाले.
◆◆◆