आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज (2 ऑगस्ट) सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. “ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील” अशी भावना टोपे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली आहे, तिची पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. “आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता  राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना”, अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

“राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. टोपे कुटुंबीयांचा कुटुंबातील अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय टोपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर शारदाताई यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो”, अशी श्रद्धांजली मंत्री छगन भुजबळ यांनी वाहिली.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लिहितात, “राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही टोपे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: