पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम

वृत्तसंस्था

दुबई, ५ नोव्हेंबर

दुबईमध्ये झालेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझमने 58 चेंडूत 79 धावांची खेळी करत सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडून काढला आहे.

दुबईत झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा 47 धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबतच पाकिस्तानने न्यूझीलंडचा 3-0 असा व्हाईटवाश करून मालिकाही जिंकली आहे. या सामान्यापूर्वी पाकिस्तानच्या बाबर आझमला एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज होती. त्याने 58 चेंडूत 79 धावांची खेळी करून सर्वात कमी सामन्यांत एक हजार धावांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम आजपर्यंत विराट कोहलीच्या नावावर होता.

याआधी विराट कोहलीने एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 27 सामने खेळले आहेत, तर बाबर आझमने 26 सामन्यात एक हजार धावा पूर्ण करून हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिसऱ्या सामन्यात बाबरने 54.26 च्या सरासरीने 1031 धावा पूर्ण केल्या.

 

◆◆◆

 

तुमच्या लिखाणांचे, प्रतिक्रियांचे आणि सूचनांचे writeto@marathibrain.com वर स्वागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: