पोलादाची मागणी 11 टक्क्यांनी वाढणार
घर बांधणी व पायाभूत सुविधा क्षेत्रांकडून मागणी वाढणार
नवी दिल्ली: आगामी 3 वर्षात भारतात पोलादाची मागणी 10 ते 11 टक्क्यांनी वाढणार असल्याचे या उद्योगाकडून सांगण्यात आले. एक तर सरकार पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देत आहे. स्वत: सरकारही या कामात पुढाकार घेत आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्राकडूनही कामे करून घेणार आहे. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या पोलादाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर रिऍल्टी क्षेत्रातील मरगळ कमी होत आहे. त्यामुळे या क्षेत्राकडूनही पोलादाला मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलाद उत्पादकांची संघटना असलेल्या जेपीसीचे अर्थतज्ञ एफ. एस फिरोझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापेक्षा पोलादाची मागणी कमी राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलाद उद्योगातील मरगळ कमी होण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच पोलादाची मागणी 8 टक्क्यांनी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वाहन उद्योगातूनही पोलादाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या उद्योगाची उत्पादकता वाढत जाण्याची शक्यता आहे.
सौजन्य: दैनिक प्रभात
सौजन्य: दैनिक प्रभात