‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या ५१ शाखा बंद होणार!
मुंबई, ३ ऑक्टोबर
शहरी भागातील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या ५१ शाखा बंद होणार असल्याचे, बँकेच्या पुणे मुख्यालयातून जाहीर करण्यात आले आहे. या शाखांमधून बँकेला कोणताही फायदा होत नसल्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या देशभरात १९०० शाखा आहेत. यांपैकी शहरी भागात असलेल्या ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला आहे. या बँकांतील खातेधारकांचे दुसऱ्या शाखेत विलीनीकरण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
संबंधित ग्राहकांना देण्यात आलेले चेकबूक ३० नोव्हेंबरपर्यंत बँकेत परत करावे लागणार आहेत त्यानंतर त्यांना नवीन आयएफएससी आणि एमआयसीआर कोड देण्यात येणार आहेत. त्यानुसार ग्राहकांन/खातेधारकांना नव्याने बँकेचे व्यवहार करता येणार आहेत.
◆◆◆