‘बळीराजा’

 

तुटलेले हृदय, कोरड्या घशाचं आभाळ,

चहुकडे भयानक दुष्काळ ।

चेहऱ्यावर उमटलेल्या नक्षीदार खुणा

भविष्याच्या पुष्कळ…  ( १ )

 

तो उभा असतो टक लावुन,

नजर त्याची नभांवर ।

चातकासारखा व्याकुळ जीव

बरसेल पाऊस माळरानावर… ( २ )

 

आयुष्याचा कडवटपणा,

मात्र बुंदीचे लाटु वऱ्हाडीच्या ताटात ।

मुलीचे लग्न केले त्यानी

तीच्या सुखी संसारासाठी थाटात… ( ३ )

 

तोही तुमच्या- माझ्यासारखाच,

मासाचा गोळा ।

काळ्या आईची सेवा करणारा

बळीराजा साधाभोळा… ( ४ )

 

बदलेल ही वेदनादायी,

असह्य परिस्थती ।

आस त्याची पक्की मनामधली

भविष्याची प्रगती… ( ५ )  

 

मनातल्या भावनांनी,

डोळ्यातले नभ मात्र दाटले ।

नशिबाचा कोप स्वतःच्या

सुखी संसाराचे पदर मात्र फाटले… ( ६ )

 

आपला सरजा-राजा , प्रेमळ बायको निरागस,मुलांना पोरकं करून जीवन संपवलं ।

राबराब राबून सावकाराच्या कर्जात

सारं आयुष्य खपवलं… ( ७ )

 

भिन्न स्वरूप बळीराज्याच्या वेदनांचे,

तुम्ही सुखी पैशावले धनाढ्य राव !

हात जोडुन एवढीच विनंती

“नका मागू पाडून शेतमालाला भाव”… ( ८ )

 

कवी :-  गणेश गंगाधर वरपे

      ( तालखेड, जि. बीड )

इमेल: 1505ganesh@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: