‘लाचारीचा पाठ गीरवायला हवा!’

कधी कधी वाटतं, आपणही
लाचारीचा पाठ गीरवायला हवा.
ईतरांप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी
हवा तो झेंडा मिरवायला हवा…!

हल्ली विचार आणि तत्वाचंसुद्धा
शेतमालासारखंच झालंय,
पिकलच तर कुठे विकणासं झालंय.
बईमाणी आणि संधीसाधुपणा,
आपल्याही अंगी का बरं नसावा.
आपणही लाचारीचा पाठ गीरवायला हवा…!


काय चुक, काय बरोबर हे ठरवण्याचा
अधिकार आपल्याला कुणी बरं दिलाय?
आपण ज्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो,
त्यांनीच आधी त्यांच्या हक्काचा सौदा केलाय.
आपला विचार केवळ स्वतःच्याच,
फायद्यापुरताच मर्यादित असायला हवा.
आपणही लाचारीचा पाठ गीरवायला हवा…!

विचार करतेवळी स्वाभिमान
मात्र नेहमी आडवा येतो..
बोलतो, तुला काय कमी पडलय?म्हणून चाकरीला जातो..

मिळेल बंगला-गाडी पण एकदा विकलेला

स्वभिमान परत कोणत्याच
बाजारात विकत भेटत नाही,
आणि लाचारांचे नाव कधीही

ईतीहासात खतत नाही..!

इतरांच सोड पण किमान स्वतःला

तरी स्वतःकडे आरशात पाहताना,

नक्कीच अभिमान वाटायला हवा.
एका ओळीचाच का असेना,

पण इतिहास नवा घडवायला हवा…!

कवी- राहुल पाटील शिंदे
ईमेल : rahulshindemns@gmail.com
भ्र. क्र. +919657853700

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: