मराठवाड्यात ११ महिन्यांत ८५५ शेतकरी आत्महत्या !

मराठीब्रेन वृत्त

औरंगाबाद, १२ डिसेंबर

राज्यातील शेतकरी आत्महत्या हा मुद्दा अतिशय गंभीर झाला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या तर काही केल्या थांबेना. चालू २०१८, वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील तब्बल ८५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

मराठवाड्यातील गेल्या ११ महिन्यांतील ८५५ शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आली आहे.

पावसाच्या अभावाने शेतीवर होणारे परिणाम, दुष्काळामुळे होणारी नापिकी, डोक्यावर वाढत जाणार कर्जाचे ओझे, त्यातच गरिबी आणि रोगराई अशा चौफेर संकटांनी राज्याच्या शेतकरी पर्यायशून्य झाला आहे. या सर्व त्रासांना वैतागून शेतकरी आत्महत्येकडे वळतो. त्यातच मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र तर थांबवण्याऐवजी उलट वाढतच चालले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ मध्ये मराठवाड्यातील तब्बल ८५५ शेतकऱ्यांनी आपला जीव दिला आहे. ही माहिती मराठवाडा महसूल विभागातून प्राप्त झाली आहे. सोबतच, जिल्हा समितीच्या तपासणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, प्रशासकीय स्तरावर ५३२ प्रकरणे पात्र ठरली असून २४० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तर ८३ प्रकरणे प्रलंबित असल्याची आकडेवारी दै लोकसत्ता ने प्रकाशित केली आहे.

सेंद्रिय शेती काळाची गरज!

गेल्या पाच वर्षांपासून अनियमित पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न मिळवताच आलेले नाही आहे. यावर्षीही पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बँक आणि सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे ओझेही वाढत गेले आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी

खरीप हंगामाच्या सुरुवातील राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यामुळे सुरुवातीला शेतकरी जरा सुखवलेही होते, मात्र खरीप हंगामात लागवड केल्यानंतर पावसाने मारलेली दांडी आणि पुन्हा निर्माण झालेली दुष्काळी स्थिती यामुळे विभागातील शेतकरी अजून संकटात व कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: