‘आकांत !’

ब्रेनसाहित्य | कविता

 

सारा हा आकांत तु
कुणासाठी केला,
जे तुझे होते त्यांनाच
तु नको नकोसा झाला…|

तुला आजही ती उपमा
दिली जाते बळीराजाची,
तु आजही लाखोंचा
‘भाकरीचा बाप’ झाला…|

होत असतील कैक कावे
तुला मातीत मिळवण्याचे,
तुच रे बा! आत दुःख गिळून
त्यांचाही बाप झाला…|

सत्तेसाठी लाचार ते फक्त
आणि खुर्ची पुरते दिसतात,
जेव्हा तु मरतो तेव्हा तोच
सत्तेचा भुकेला दिसेनासा झाला…|

आत्ता काळ्या मायच्या लेका तुही
थोडा विचार केला पाहिजे,
जो तुझा होतो ना आकांत,
तो त्यांचाही तसाच पाहिजे झाला…|

– तुषार भा. राऊत

ई-पत्ता : rautt9948@gmail.com

मो. नं. ८४०७९६३५०९


(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: