अयोध्येत मंदिरातून मूर्त्यांची चोरी !

वृत्तसंस्था | आयएएनएस

ब्रेनवृत्त | अयोध्या


अयोध्येतील शंभर वर्षे जुन्या असलेल्या एका मंदिरातून आठ प्राचीन मूर्त्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मंदिरातील हे शिल्प गायब असल्याचे काल (बुधवारी) कळल्यानंतर हैदरगड पोलीस चौकीत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश कुमार पांडे याबाबत माहिती म्हणाले, “मंदिरातून प्राचीन मूर्त्यांची चोरी झाली आहे. सुरुवातीला नऊ मूर्त्या गहाळ झाल्याची चर्चा होती, मात्र नंतर एक मूर्ती मंदिराच्या आवारातच सापडली. आम्ही या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, संबंधित तपास सुरू केला आहे.”

प्रातिनिधिक छायाचित्र

१३ व्या शतकातील मंदिराला मिळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मंदिर खासगी जागेवर बांधलेले आहे. पूर्वीच्या राजघराण्याचे वारसदार असलेले आनंद कुमार सिंह यांच्या जागेवर हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे व्यवस्थापन राम जानकी ट्रस्ट या खासगी विश्वस्त संस्थेकडे आहे. सिंह यांच्या पूर्वजांनी शंभर वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असून, यामध्ये अनेक प्राचीन मूर्त्या आहेत.

काल (बुधवारी) मंदिराच्या पुजाऱ्याला मंदिराच्या आतील द्वाराचे कुलूप तोडलेले व आतील मूर्त्या गायब असल्याचे आढळले.

हैदरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी सत्येंद्र भूषण तिवारी यांनी सांगितले, की सर्व मूर्त्या ह्या धातूच्या असून ३ ते ९ इंच अशी त्यांची उंची आहे तसेच त्या शेकडो वर्षे जुन्या आहेत. चोरांचा शोध घेण्यासाठी आम्ही दोन टीम तयार केल्या आहेत. यासाठी आम्ही स्थानिक हेर, स्क्वाड कुत्रे आणि फॉरेन्सिक यंत्रणांचाही वापर करत आहोत. 

हेही वाचा 👉 राम मंदिरासाठी दान करणाऱ्यांना मिळणार प्राप्तिकरात सूट 

दरम्यान, मंदिरात कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक वापरले जात नाही तसेच सीसीटीव्ही यंत्रणाही उपलब्ध नाही. मंदिराचा पुजारीच मंदिराची सुरक्षा बघतो आणि रात्री कुलूप लावतो, असेही तिवारी यांनी सांगितले. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: