‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची नवी नियमावली

ब्रेनवृत्त, २३ मे

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जसा औद्योगिक, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्राला बसला आहे, तसाच तो क्रीडा क्षेत्रालादेखील बसला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) सर्व सामने स्थगित केले आहेत.

मात्र, सामने स्थगित असल्याने क्रिकेट मंडळाच होणारं नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बीसीसीआयने नवीन नियमावली जाहीर करून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दौऱ्याआधी १४ दिवस विलगीकरण शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर काही कठोर नियमही या नियामवलीत नमूद केले आहेत.

१) स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रवास करताना सर्व संघांना सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचं पालन करावं लागणार आहे.

२) स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच आपापल्या भागात क्रिकेट सराव किंवा सामने सुरु करता येतील. एखाद्या भागात सरावासाठी किंवा सामन्यासाठी सरकारी परवानगी नसेल, तर ती मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारे क्रिकेट खेळलं जाणार नाही.

 ● सुरक्षा 

१) कोणत्याही सराव सत्र किंवा सामन्याआधी खेळाची आणि सरावाची जागा, ड्रेसिंग रुम, क्रिकेटचं साहित्य आणि इतर गोष्टींमार्फत प्रादूर्भाव होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

२) स्थानिक भागात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खात्री असल्यानंतरच क्रिकेट सराव सुरु केला जाईल.

३) संपूर्ण क्रिकेट विश्वाची सुरक्षा हे आयसीसीचं सध्याच्या घडीला प्रथम कर्तव्य आहे.

● सकारात्मक प्रभाव 

१) करोनासारख्या विषाणूचा सामना करताना खेळाडूंची वागणूक ही समाजासमोर आदर्श निर्माण होईल अशी असली पाहिजे.

२) आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आयसीसी क्रिकेट पुन्हा एकदा सुरक्षित पद्धतीने खेळवलं जाईल यासाठी सर्व काळजी घेईल.

३) एखाद्या व्यक्तीचं आयुष्य रुळावर आणण्याची ताकद क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक तंदुरुस्ती साधण्याचं काम क्रिकेटकडून अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: