‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !
ब्रेनविश्लेषण | आयसीएमआर सिरो सर्वेक्षण
‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’द्वारे (ICMR) करण्यात आलेल्या एका ‘सामुदायिक राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणा’तून (sero-survey) एक आशादायक बातमी समोर आली आहे. या सर्वेक्षणात ‘कोव्हिड-१९‘चा संसर्ग झालेल्या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय बरे झाल्याचेे आढळून आले आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूने देशभरात हाहाकार माजवला असताना आयसीएमआरचे हे सर्वेक्षण संपूर्ण देशासाठी एक आशेचा किरण मानला जात आहे
उपलब्ध माहितीनुसार, आयसीएमआरच्या रिपोर्टमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देशात कंटन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आले. एवढचं नाही, तर या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठीक झाल्याचेही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : तीन संस्था एकत्रितपणे विकसित करणार ‘कोरोना चाचणी किट‘
तसेच अहवालातील माहितीनुसार, हा परिषदेद्वारे करण्यात आलेला पहिला राष्ट्रीय पातळीवरील सिरो सर्वेक्षण आहे. यामध्ये देशाच्या 70 जिल्ह्यांमधून जवळपास 24000 नमूने घेण्यात आले होते. सर्वेक्षण केलेल्या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचा दर सर्वाधिक आहे. या भागात इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत 100 पटींनी जास्त संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर हा दावा आयसीएमआरने केला आहे. हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधान कार्यालयालाही (PMO) पाठविण्यात आला आहे.
‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही !
आयसीएमआरच्या अहवालानुसार, हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये ‘SARS-CoV-2’च्या (कोरोना विषाणू) विरोधात तयार होणाऱ्या IgG प्रतिपिंडांचा (Antibodies) शोध घेण्यासाठी करण्यात आला होता. त्यानंतर IgG प्रतिपिंडे रुग्णांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनी दिसतात आणि संसंर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरमस्वरूपात राहतात. हे सिरो सर्वेक्षण राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र (NCDC : National Centre for Disease Control), डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य शासनांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे.