२६.७ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती उघडकीस !
तुलनाकार (कंपॅरिटेक)आणि सुरक्षा संशोधक बॉब डायचेंको (सिक्योरिटी रिसर्चर Bob Diachenko) यांनी एक डेटाबेस शोधून काढला आहे, ज्यात सुमारे २६.७ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती असुरक्षितरित्या साठवण्यात आली आहे. वाचा सविस्तर…
ब्रेनविश्लेषण | ब्रेनटेक
माहिती चोरी (डेटा थेफ्ट) आणि इतर गैरव्यवहारांमुळे आधीच अडचणींचा व चर्चेत असलेल्या ‘फेसबूक‘च्या अडचणींमध्ये नव्याने वाढ झाली आहे. सुमारे २६ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांची माहिती त्रयस्थांकडे (थर्ड पार्टीज) उघड झाल्याची नवी बाब एका अहवालातून समोर आली आहे.
तुलनाकार (कंपॅरिटेक)आणि सुरक्षा संशोधक बॉब डायचेंको (सिक्योरिटी रिसर्चर Bob Diachenko) यांनी एक डेटाबेस शोधून काढला आहे, ज्यात फेसबुक वापरकर्त्यांची माहिती असुरक्षितरित्या साठवण्यात आली आहे. याविषयी बॉब यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, जगभरातील जवळपास 26 कोटी 71 लाख 40 हजार 436 फेसबुक वापरकर्त्यांची माहिती या ऑनलाईन डेटाबेसवर उपलब्ध आहे. या उघड झालेल्या विदामध्ये (डेटा) फेसबुक वापरकर्त्यांची आयडी, संपर्क क्रमांक व नाव, अशा माहितीचा समावेश आहे.
विविध वृत्तसमूहांकडून होणार फेसबुकला बातमी पुरवठा
या उघड झालेल्या महितीविषयी गंभीर बाब म्हणजे, ही माहिती कोणत्याही गोपनियतेशीवाय उपलब्ध होणारी आहे. याविषयी अहवालकर्ते बॉब म्हणतात, “हा डेटाबेस पासवर्ड किंवा इतर संकेतांकांशिवाय कुणालाही मोफतपणे उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे या माहितीचा वापर करुन फसवे संदेश एसएमएस आणि सायबर हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो.” बॉबच्या मते हा डेटा अवैध स्क्रॅपिंग प्रक्रिया (Illegal Scrapping Operation) अथवा फेसबुक ‘अनुप्रयोग आज्ञावली आंतरपृष्ठ’ ( API – Application Programming Interface) चा चुकीचा वापर करून गोळा करण्यात आला आहे.
[NEW REPORT] 267 million Facebook users IDs and phone numbers exposed online. This looks like another exposure, not similar to the previously reported in Sept. More here: https://t.co/eNMacda647
— Bob Diachenko (@MayhemDayOne) December 19, 2019
या प्रकार उघडकीस आल्यानंतर बॉब यांनी संबंधित सर्व्हरचा आयपी ऍड्रेस व्यवस्थापित करणाऱ्या आंतरजाल सेवा प्रदात्याला (Internet Service Provider) ला संपर्क साधून संबंधित माहिती त्यांच्या सर्व्हरवरुन हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून ही माहिती या डाटाबेसमध्ये उपलब्ध असल्याने अनेकांनी ही माहिती आपल्याकडे साठवली असण्याची शक्यता बॉब यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा : फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!
दुसरीकडे, या प्रकाराची दखल घेत अमेरिकी तंत्रज्ञान संकेतस्थळ ‘एनगॅजेट’ (Engadget) ने फेसबुकला याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना फेसबुकने म्हटले की, “आम्ही या प्रकाराची दखल घेत आहोत. मात्र, हा उघड झालेला डेटा काही वर्षांपूर्वीचा आहे, आताचा नाही. कारण, नुकतेच आम्ही वापरकर्त्याच्या माहितीला सुरक्षित करण्याच्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे.” जर फेसबुकचे हे विधान खरे असेल, तरीही ज्या २६.७ कोटी वापरकर्त्यांची माहिती उघड झाली आहे, त्यांच्या गोपनियतेवर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होणे शक्य आहे.
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.