जिल्हा सेवा विभागातर्फे ‘आदर्श तुमच्या भेटीला’ कार्यक्रमाचे आयोजन

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

कल्याण, ९ डिसेंबर

कल्याण येथील जिल्हा सेवा विभागातर्फे सेवा सप्ताहानिमित्त रविवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी ‘श्री. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालया’त ‘आदर्श तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांतर्गत ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमधील एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात विविध पदांवर कार्यरत असलेले अधिकारी उपस्थित होते.

विधानसभेच्या मुहूर्तावर व्यंगचित्रांतून अशीही जनजागृती ! 

‘आदर्श तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक विभाग वर्ग १ चे जलसिंचन प्रकल्प अधिकारी श्री. महेंद्र पाटील, हे व्यख्याते म्हणून उपस्थित होते. तसेच निवृत्त लेखा अधिकारी श्री. डी. आर. उमडकर व श्री. नरेंद्रजी चौधरी सर हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे ५० विद्यार्थी, तसेच पालकांनीही सहभाग नोंदविला. “अचूकता व विशिष्टता या गोष्टी अभ्यासात असल्याशिवाय स्पर्धा परीक्षा पार करता येत नाहीत” हा संदेश उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

ग्रंथालय चळवळीला राजाश्रय : एक ‘दिवास्वप्नच’

तसेच, काहींनी स्पर्धापरिक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुस्तकांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण जिल्हा सेवा विभाग प्रमुख श्री. संतोषजी हिंदळेकर, ग्रंथालयाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. सहाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: