‘कोव्हिड-१९’ म्हणजे चीनने दिलेली ‘वाईट भेटवस्तू’ !

वृत्तसंस्था | वॉशिंग्टन

“कोव्हिड-१९ हे चीनने जगाला दिलेली भेटवस्तू (Gift) आहे. हे चांगले नाही, मात्र चीनने कोरोना विषाणूला स्रोताच्या ठिकाणीच रोखायला पाहिजे होते. या महामारीची जिथून सुरुवात झाली, त्या वुहान शहराची स्थिती खूप वाईट आहे. पण हा आजार चीनच्या इतर भागांत पसरला नाही, हे कसे शक्य आहे”, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल म्हणाले. अमेरिकेत सुरू असलेल्या विविध लसींच्या चाचण्या आणि आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूविरुद्ध तयार करण्यात येत असलेल्या विविध लसींविषयी वॉशिंग्टनमध्ये गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत ‘कोव्हिड-१९‘चा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम व तसेच, लसींच्या तयार असलेल्या मात्रा (Doses) याविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर काल झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “कोरोना विषाणूंवर उपचार म्हणून देशात अनेक लसींवर काम सुरू असून आम्ही उत्तमरीत्या प्रगती करीत आहोत. लवकरच आम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची आशा आहे.”

हेही वाचा : ऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘कोव्हिड-१९’वरील लसीच्या मानवावर चाचण्या सुरू

कोरोना विषाणूमुळे अमेरिका सर्वात वाईट परिस्थितीतून जात असून, राष्ट्राची आर्थिक स्थिती कोरोनामुळे पार बिघडली.  “कोरोना लसींचे सुमारे २० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध आहेत. एकदा लसीची तपासणी पूर्ण झाली, की आम्ही जगाला तिचा पुरवठा करण्यासाठी तयार असू”, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच, कोरोना विरुध्दच्या लसींसाठी आम्ही संपूर्ण जगासोबत काम करू आणि वेळ आल्यास चीनसोबतही काम करू, पण जे घडले आहे ते परत सुधारणे अशक्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेनविश्लेषण : ‘कोव्हिड-१९’वर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ संख्यात्मकरित्या प्रभावी नाही !

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण खाली आले आहे. गेल्या मे महिन्यात अमेरिकेतील सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे व बेरोजगारीचा दरही 14.7% वरून 13.3% वर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: