‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता

अनलॉक ४ अंतर्गत, अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्चमध्ये घोषित करण्यात आलेली टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात येत असून, येत्या १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ कार्यान्वित केले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील शाळा सुरू करण्याचे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र

केंद्र सरकारकडून टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथिल करण्यासाठी ‘अनलॉक’ कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनलॉकचे तीन टप्प झाले आहेत. तिसरा टप्पा ३१ ऑगस्टला पुर्ण होणार असून, त्यानंतर अनलॉक ४ जाहीर केला जाणार आहे. अनलॉक ४ अंतर्गत, अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली.

ब्रेनसाहित्य | ‘ऑनलाइन शिक्षण’? जरा जपूनच !

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले, मात्र शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच होता. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही, कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली, तर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.”

वाचा | शासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

तसेच, दहावीच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग सुरू करू व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: