‘चक्रीवादळांना जाणून घेताना…’

‘चक्रीवादळ’ हे नाव जरी उच्चारले, तरी मोठ्या विध्वंसाचा आभास होतो. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘निसर्ग चक्रीवादळा’ने असेच थैमान घातले. मुंबई, कोकणसह राज्यातील किनारपट्टी भागात या निसर्ग वादळाने बरेच नुकसान झाले. तसेच, या चक्रीवादळाचा प्रभाव राज्याच्या इतर भागांतही सतत दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या रुपात आपण अनुभवतो आहोत. मात्र तुम्हाला माहित आहे का, की या चक्रीवादळांची निर्मिती कशी होते? त्यांची नावे कशी ठरवली जातात? चक्रीवादळांचे मापन कशाप्रकारे केले जाते? यांबद्दल आज आपण जाणून घेत आहोत.

 

ब्रेनविशेष | चक्रीवादळे

● चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?

वादळ म्हणजेच ‘सायक्लोन’ (Cyclone). या शब्दाची निर्मिती ‘सायक्लोस’ या ग्रीक शब्दापासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘सापाचे वेटोळे’ असा होतो. समुद्रात एका कमी दाबाच्या पट्ट्यात चारी बाजूने येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा झाल्यामुळे या वादळाचे रुपांतर चक्रीवादळात होते. त्यातच समुद्राचे तापमान हे देखील चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे मानले जाते. समुद्रात २६ ℃ तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते.

ही चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने (Anticlockwise) व दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (Clockwise) वाहतात. यांमध्ये अफाट शक्तीचा समावेश असतो. एक पूर्ण विकसित चक्रीवादळ १५० ते १००० कि. मी. एवढ्या अंतराचा टप्पा पार केल्यानंतर १० ते १५ कि. मी. एवढी त्याची उंची वाढते. भारतात बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये या वादळांचे सापाच्या वेटोळ्यासारखे चित्र दिसल्यामुळे ‘हेन्री पेडिंगटन‘ यांनी या वादळांना ‘सायक्लोन’ असे नाव दिले. तेथून पुढे हिंदी महासागर, अरबी समुद्र व तसेच, आशिया-प्रशांत भागांत निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना ‘सायक्लोन’ असे संबोधले जाऊ लागले.

● चक्रीवादळांना नावे का दिली जातात ?

वादळांचा अक्षांश आणि ते वादळ ज्या भागात तयार झाले तो भाग, लक्षात ठेवण्यासाठी वादळांना नावे दिली जातात. शिवाय, अशी नावे दिल्यामुळे हवामान वेधशाळेद्वारे समुद्रातील जहाजांना सूचना देणे शक्य होते. मियामीपासून काही अंतरावरच राष्ट्रीय हरिकेन केंद्र (National Hurricane Centre) आहे. हे केंद्र सर्व समुद्रीय वादळांवर कटाक्षाने नजर ठेवते. हवेचा वेग ३९ मैल प्रतितास झाल्यानंतर लगेच त्याला चक्रीवादळ म्हणून घोषित केले जाते त्यास विशिष्ट नावही देण्यात येते. सुरुवातीला या वादळांना विशिष्ट नाव दिल्यानंतर त्यांचे रूपांतर अधिकृत कागदपत्रांमध्येही केले जाते. ते बदलायचे झाल्यास सुरुवातीचे अक्षर व लिंग कायम ठेवूनच ते बदलले जाते.

● चक्रीवादळांची नावे कशी ठरवली जातात?

चक्रीवादळांना हवामान खात्याच्या सांकेतिक आणि शास्त्रीय नावांऐवजी त्या त्या देशातील वैशिष्टपूर्ण नावे दिले जाते. चक्रीवादळांना नावे देण्याचा प्रघात १९५० च्या दरम्यान सुरू झाला. सुरुवातीला या चक्रीवादळांना गंमतीने महिलांची नावे दिली जात. अमेरिकेत चक्रीवादळाला आजही महिलांचेच नाव दिले जाते. भारतीय उपखंडात थडकणाऱ्या चक्रीवादळाची नावे दिल्लीतील प्रांतीय विशेषीकृत हवामान केंद्र (Regional Specialised Meterogical Centre) ठरवते.

ब्रेनविशेष : ‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली

● चक्रीवादळाचे मापन

चक्रीवादळातील वाऱ्यांच्या वेगावरुन चक्रीवादळाचे मापन श्रेणींमध्य केले जाते. वादळातील हे किमान ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात. वाऱ्यांच्या वेगावरच त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते.

● वातावरणीय स्थिती – वाऱ्यांचा वेग (प्रतितास किमीमध्ये)

> कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) – ३२ पेक्षा कमी
> कमी दाब (Depression) – ३२ ते ५०
> खोल कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) – ५१ ते ५९
> चक्रीवादळ (Cyclone) – ६० ते ९०
> तीव्र चक्रीवादळ (Severe Cyclonic Storm) – ९० ते ११९
> अतितीव्र चक्रीवादळ (Very Severe Cyclonic Storm) – ११९ ते २२०
> महा चक्रीवादळ (Super Cyclone) – २२० पेक्षा अधिक

ब्रेनविशेष : ‘सॉल्फरिनोची लढाई’ आणि ‘रेडक्रॉस’ची स्थापना

● भारतातील अलीकडची मोठी चक्रीवादळे

निसर्ग (२०२०), अम्फान (२०२०), वायू (२०१९), बुलबुल (२०१९), फनी (२०१९), तितली (२०१८), फेथाई (२०१८), वरदः (२०१६), हूडहूड (२०१४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: