हिंदू प्रतिष्ठान मंडळाने समाजकार्य करावे : खा. विजयसिंह मोहिते पाटील

मराठीब्रेन । प्रतिनिधी 

ब्रेनवृत्त । माळशिरस


माळशिरस येथील हिंदू प्रतिष्ठान मयुर मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने नृत्य व गायन स्पधेॅचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी बोलताना खा. विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, ‘हिंदू प्रतिष्ठान गणेश मंडळाने इथून पुढे समाजकार्य करावे. हिंदू प्रतिष्ठान मयूर मित्र मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद आहे.’

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन पिसे , संजय मस्के , ऍड. मिलिंद कुलकर्णी, धनंजय मस्के, माजी सरपंच विष्णूपंत केमकर , गायक शंकर पिसे , नंदकुमार गांधी व इतर नागरिक उपस्थित होते. या नृत्य-गायन स्पर्धेत जिल्ह्याच्या विविध भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शंकर पिसे व सुत्रसंचालन निशा फुले यांनी केले.

(बातमी प्रतिनिधी: सोहेल पठाण )

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


तुमच्या परिसरातील विशेष घडामोडी आणि उपक्रमांची माहिती पाठवा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: