वैद्यकीय विद्यार्थ्यांना आयुषचे प्रशिक्षण देण्यास आयएमएचा विरोध !

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) देशातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुषचे (AYUSH) प्रशिक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पदवी शिक्षणाशी संबंधित नसलेल्या औषध प्रणालीचे प्रशिक्षण देणे सुसंगत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात आयएमएने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (NMC : National Medical Commission) तसे विरोध दर्शवणारे पत्र पाठवले आहे.

“आधुनिक औषधशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेल्या एका इंटर्नला, ज्याने त्याच्या पदवी शिक्षणात ज्या औषध प्रणालीचे शिक्षणच घेतलेले नाही आणि त्याविषयीच्या संबंधित बाबींचे अनुभव नाही, त्याला त्या प्रणालीचे प्रशिक्षण देणे व त्यानांतर्गत काम करवून घेणे योग्य नाही”, असे भारतीय वैद्यकीय संघटनेने आयोगाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वाचा । बाबा रामदेवांची ‘पतंजली झाली करमुक्त’ !

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) देशभरातील आधुनिक औषधशास्त्राचे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या इंटर्न विद्यार्थ्यांना २०२१ मध्ये फिरत्या तत्त्वावर इतर वैद्यकशास्त्र शाखा म्हणजे ‘आयुष’चे (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) अनिवार्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयोगाने संबंधित परिपत्रकाचा मसुदा जाहीर केला असून, त्यावर सूचना मागवल्या आहे. या परिपत्रकानुसार, आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एक आठ्वड्याचे आयुषचे अनिवार्य प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यासंबंधी काम करावे लागेल. 

दरम्यान, देशभरातील डॉक्टरांचे व वैद्यकीय विद्यार्थांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संघटनेने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. संघटनेने आयोगाला यासंबंधी एक पत्र पाठवले असून, त्यात या  निर्णयाचा विरोध केला आहे. निवेदनात असेही लिहिले आहे, “वैद्यकीय विद्यार्थ्यांना परिपूर्ण मनुष्य बनवण्यासाठी काय आपण येणाऱ्या आठवड्यांत त्यांना कृषी आणि अभियांत्रिकीचेही प्रशिक्षण देणार आहात? इतर शास्त्राचे फक्त एका आठवड्यासाठी प्रशिक्षण काहीही फरक विशेष फरक पडत नसतो, तर त्याने उलट अर्धवट ज्ञान मिळते. यामुळे तुम्ही फक्त मिक्पॅसोथीला (विविध शास्त्रांची नुसतीच गुंतागुंत) आमंत्रित करीत आहात, जे या देशासाठी अतिशय घटक ठरू शकते.” 

नीट परीक्षेची तारीख जाहीर; आजपासून अर्जप्रक्रिया सुरू

विशिष्ट औषधशास्त्राच्या विद्यार्थ्याला दुसऱ्या औषध प्रणालीचे शिक्षण देणे चुकीचे आणि नियमबाह्य असल्याचे आयएमएने म्हटले आहे. प्रत्येक व्यवसायाची एक विशेषता आणि शुद्धता असते आणि हीच एकरूपता राखण्यासाठी संघटना या निर्णयाचा विरोध करत असल्याचेही आयएमएने निवेदनात म्हटले आहे.

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: