भारतीय लोक भाषणबाजीत आघाडीवर : राज्यपाल कोश्यारी
संग्रहित छायाचित्र
सोलापूर येथील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा’त आयोजित २३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते आले. यावेळी त्यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळप्रकारांत भारताच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत देशातील लोकांनाच टोला लगावला आहे. ते म्हणाले की, भारत देश 130 कोटींचा असला, तरी तो क्रीडाप्रकारांत मागे असून, भाषणबाजीत मात्र खूप पुढे आहे. यामुळे ऑलम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाला कमी पदके मिळतात.
“क्रीडा क्षेत्र मुळात ऊर्जावान आहे. या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी मोठी ऊर्जा लागते, पण शोकांतिका म्हणजे आपण खेळासाठी ऊर्जा खर्च करत नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाला पदके मिळत नाहीत. ही स्थिती बदलण्यासाठी युवकांनी परिश्रम घेऊन क्रीडा क्षेत्रात भारताला आघाडीवर न्यावे” असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिक्षण असो वा खेळ, या सर्व क्षेत्रांत पुुुुढे जाण्यासाठी मुलींनीही प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
स्त्रियांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल कोश्यारी
तसेच, योग करण्यावर खेळाडूंनी भर द्यायला हवे, असाही संदेश त्यांनी यावेळी दिला. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जवळपास १८० देशांतील नागरिक हे आज योग करत आहेत, पण आपण मात्र पिछाडीवर आहोत. त्यामुळे आपणही योग केला पाहिजे”, असे राज्यपाल म्हणाले.
महाराष्ट्राची कांचनमाला ठरली देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पंढरपुर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा गळ्यात एका भाविकाने तुळशीची माळ घातली. तीच माळ राज्यपालांनी राजकीय शिष्टाचार बाजूला सारत तेथे एका मातेच्या कडेवर असलेल्या बालकाच्या गळ्यात घालून त्याचा सन्मान केला.
◆◆◆