भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, आरबीआयची सुधारित आकडेवारी!
ब्रेनवृत्त । मुंबई
नुकत्याच 12 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Foreign Exchange Reserve) लक्षणीय घट झाली असून, तो 763 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 640.112 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. भारताच्या गंगाजळीची (परकीय चलनसाठ्याची) १२ नोव्हेंबरपर्यंतची सुधारित आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच जाहीर केली आज. या आधीच्या, म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 1.145 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून घसरून 640.874 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला होता.
वाचा । शासनाची खरी दिवाळी; ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींचा जीएसटी!
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (शुक्रवारी) अलीकडच्या आठवड्यातील भारतीय परकीय चलनसाठ्याची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, भारताचा परकीय चलनासाठा कमी होऊन 640.112 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. यामध्ये चलन साठ्याचा सर्वांत महत्वाचा घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये (FCA : Foreign Currency Assets ) सर्वाधिक घट नोंदवली गेली आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्याने 642.453 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीनुसार मागील आठवड्यात देशाची परकीय चलन मालमत्ता 2.094 अब्ज अमेरिकी डॉलरने कमी होऊन 575.487 अब्ज डॉलर्स इतकी झाली.डॉलरच्या रूपात दर्शविल्या जाणार्या परकीय चलन मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस युनिट्सच्या मूल्यवृद्धी किंवा घसरणीचा परिणामही परकीय चलनसाठ्यात (Forex) समाविष्ट असतो.
ब्रेनबिट्स । काय आहे महाराष्ट्र शासनाची ताराराणी योजना?
दुसरीकडे, परकीय चलन साठ्यातील सोन्याचा साठा 1.461 अब्ज अमेरिकी डॉलर्सने वाढून 40.239 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) सोबतचे विशेष निधी हक्क (SDRs) 103 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवरून 19.184 बिलियन अमेरिकी डॉलर्सवर घसरले. तसेच, अहवालात संदर्भ घेतलेल्या आठवड्यात देशाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील राखीव स्थिती 27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सने घसरून 5.201 अब्ज डॉलर्स झाली आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in