खाजगी शिकवणी वर्गांवर लवकरच येणार निर्बंध

जिल्हा परिषद शाळांच्या विकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे व खाजगी शिकवणी वर्गांवर लवकरच निर्बंध आणले जाणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

 

ब्रेनवृत्त

मुंबई, २८ जून

जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण, क्रीडा व युवा कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. शिक्षणविषयक पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सोबतच, लवकरच खाजगी शिकवणी वर्गांवर निर्बंध आणले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे समाजाच्या शेवटच्या घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना विविध सुविधा व सोयी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. यासंबंधीचे वृत्त लोकमत ऑनलाइनने प्रकाशित केले आहे. हा निधी शाळांच्या दुरुस्तीसाठी व पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच ग्राम विकास विभागातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोबतच, खाजगी शिकवणी वर्गांवर निर्बंध आणणारा कायदा संबंधित समितीने तयार केला असून महिनाभरात हरकती व सुचनांसाठी या कायद्याची घोषणा करण्यात येणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले. खाजगी शिवकवणी वर्गांवर या कायद्यामुळे निर्बंध येणार आहेत.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: