जेएनयूच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्वकाही!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा (JNUEE) येत्या २० ते २३ सप्टेंबर दरम्यान आयोजित होणार असल्याचे राष्ट्रीय चाचणी यंत्रणेने (NTA) काल जाहीर केले.

संग्रहीत छायाचित्र

एनटीएने (National Testing Agency) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, जेएनयूच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काल (मंगळवारी) सुरू झाली असून, २७ ऑगस्टच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. तर त्याच दिवशी रात्री ११.५० पर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार आहे.

वाचा |२०२१-२२ सत्रासाठी सीबीएसईची विशेष योजना; जाणून घ्या बदल

● कशी होणार जेएनयूची प्रवेश परीक्षा ?

– ही परीक्षा संगणकीकृत ऑनलाइन पद्धतीने होईल आणि यात सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.

– भाषिक अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका वगळता बाकी सर्व अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा इंग्रजी माध्यमातून असेल.

– ज्या इच्छुक उमेदवारांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी फक्त https://jnuexams.nta.ac.in या संकेतस्थळावरच नमूद कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करायचे आहे.

– परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा असलेली मुलाखत प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांना प्रवास करावा लागणार नाही.

संबंधित प्रवेश परिक्षेविषयी माहिती देताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू मामीदाला जगदेश कुमार यांनी सांगितले, की विद्यापीठ आणि एनटीए यांनी मिळून व विस्तृत चर्चा करून विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया येत्या २० ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्याचे ठरवले आहे.

ऑक्सिपार्क प्रकल्पावरून पुणे विद्यापीठाला उच्चशिक्षण मंत्र्यांची फटकार!

“एकदा प्रवेश परीक्षेचे निकाल लागले, की कोणत्याही प्रकारे उशीर न करता प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची विद्यापीठ खात्री करेल. मुलाखत टप्प्याचा समावेश असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुलाखत प्रक्रियासुद्धा ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाईल. त्यामुळे उमेदवारांना या कठीण काळात प्रवास करावा लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असेल, त्यांच्यासाठी शासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ खुले केले जाईल”, असे कुलगुरू म्हणाले.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा :  writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: