देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ : डी. के. शिवकुमार
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर
“देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ ठरत आहे”, अशी टीका काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे व ईडीने अटक केलेले डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेनंतर कोठडीत असलेले शिवकुमार यांनी समाजमाध्यमांवर प्रकाशित केलेल्या एका व्हिडिओत असे म्हटले आहे.
आर्थिक गैरव्यवहारावरुन कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी अटक केली. सध्या शिवकुमार ईडीच्या कोठडीत आहेत व त्यांनी थेेेट कोठडीतून एक व्हिडीओ ट्विटरवर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये शिवकुमार यांनी त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप केला आहे. “या देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडाची प्रवृत्ती अधिक शक्तीशाली झाली आहे”, असे ते म्हणत आहेत.
Political Vendetta has become more stronger than the law in this country pic.twitter.com/Ylo7QhBkKn
— DK Shivakumar (@DKShivakumar) September 4, 2019
पवारांनी आत्मचिंतन करावे : मुख्यमंत्री फडणवीस
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने अटक केलेले शिवकुमार हे दुसरे काँग्रेस नेते आहेत. शिवकुमार यांना अटक झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवकुमार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसच्या वतीने बुधवारी कर्नाटक बंद पाळण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी “भाजपला काँग्रेसचा बदला घ्यायचा आहे असेच दिसते आहे. त्याचमुळे आमच्या पक्षातल्या लोकांवर अचानकपणे कारवाई केली जाते आहे” असे म्हटलेे आहे. कोहिनूर मिलच्या प्रकरणाविषयी चौकशीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही २२ ऑगस्टला ईडीच्या समोर हजर राहावे लागले होते.
◆◆◆