संत साहित्य अभ्यासक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन!

ब्रेनवृत्त । सोलापूर


संत साहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे आज (रविवारी) सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले. त्यांनी अक्कलकोट महाविद्यालय व दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. तसेच, पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते एक ज्ञानवंत साधक होते. 

अध्यापन क्षेत्रात येण्याआधी डॉ. नरेंद्र कुंटे यांनी तरुणपणी दैनिक संचार, दैनिक समाचारमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर संत साहित्याच्या अभ्यासासह ते कायम शिक्षणक्षेत्रात वावरले. कुंटे यांनी दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणूनही काम पाहिले होते. संत साहित्य व संत चरित्रांवर त्यांनी विविध दैनिकातून विपुल लेखन केले आहे. त्यांची २७ पुस्तके प्रकाशित असून, त्यांना एकूण ८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वाचा । जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर रंगभूमी जीवगौरव पुरस्कार जाहीर !

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी अनेक पुस्तके अध्यात्मिक विषयांवरील आहेत.  संत साहित्य सेवा संघातर्फे त्यांचा ‘पुरुषोत्तम सेवा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता. प्रा. नरेंद्र कुंटे यांच्या निधनाने संत साहित्याचा एक श्रेष्ठ अभ्यासक आपण सर्वांनी गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: