स्त्रियांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल कोश्यारी
ब्रेनवृत्त, नागपूर
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी मुलांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे काल आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
नागपूर विद्यापीठातील जमनाला बजाज प्रशासकीय भवनाचे काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपालांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा घाालण्यासाठी मुलांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला दिला. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “एक काळ होता जेव्हा घराघरांत कन्यापूजा केली जायची. सध्या देशात दुष्ट लोकांकडून बलात्कार, हत्या होत आहेत. ताकदीचा वापर अत्याचारासाठी कि सुरक्षेसाठी? त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार होणार नाहीत.”
उपनगरीय रेल्वेच्या सुमारे ४५% महिला प्रवासी असुरक्षित
सोबतच, त्यांनी आपल्या भाषणात मुलांना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक समजवून सांगितले. लोक ज्ञान, शक्ती आणि पैशाचा कसा वापर किंवा गैरवापर करतात, याविषयीही ते बोलत होते. संतांची समाजाप्रतीची निष्ठा ही अमूल्य आहे, असेही ते यावेेळी म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जमनालाल बजाज प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. या भवनासाठी राहुल बजाज यांनी १० कोटींचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) दिला आहे.
◆◆◆