‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप

हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘ब्लॅक पँथर’चे अभिनेते चॅडविक बोसमन यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी बोसमन यांनी जगाला अखेरचा निरोप दिला.

 

ब्रेनवृत्त | २९ ऑगस्ट

हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘ब्लॅक पँथर’चे अभिनेते चॅडविक बोसमन यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी बोसमन यांनी जगाला अखेरचा निरोप दिला. ब्लॅक पँथर, एव्हेंजर्स यांसारख्या जगविख्यात चित्रपटांत भूमिका साकारलेल्या चॅडविक बोसमन यांच्या जाण्याने हॉलीवूडच नव्हे, तर जगभरातील सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अतिशय कमी वयात सिनेसृष्टीत आपला ठसा जगभर उमटवलेल्या चॅडविक बोसमन यांना मागील चार वर्षांपासून मोठ्या आतड्याचा (Colon Cancer) कर्करोग होता. चॅडविकच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मार्व्हलच्या पहिल्या कृष्णवर्णीय सुपरहिरो सिनेमा ‘ब्लॅक पँथर’ (२०१८ ) हा चित्रपट सामाजिक बदल आणि ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत एक मैलाचा दगड ठरला होता. आजपर्यंत सगळे सुपरहिरो हे गोरे-गोमटेच असायचे, मात्र जगाची ही परंपरा मार्व्हल स्टुडिओने 2018 साली मोडीत काढून ‘ब्लॅक पँथर’च्या माध्यमातून पहिला कृष्णवर्णीय हिरो जगाला दिला.

कोलन कॅन्सरलाकोलनला कोलायटिस’ देखील म्हटले जाते. जिवाणू, परजीवी आणि विषाणू इत्यादीमुळे याचा संसर्ग होऊ शकतो. खाल्लेले अन्नपदार्थ शरिरात जाऊन ते पचण्यासाठी आपले शरीर एक प्रकारचे पाचक रस मोठ्या आतड्यात तयार करत असते. तसेच पचनासाठी जड असलेले पदार्थ वेगळे केले जातात. ही सर्व प्रक्रिया आतड्यांमध्ये होत असते, तर नको असलेले विषारी पदार्थ कोलनमध्ये साठून ते मैलावाटे बाहेेेर फेकले जातात. या कोलनला संसर्ग झाल्यास अतिसार आणि ताप येण्यास सुरुवात होते. याशिवाय पोटात दुखणे, थकवा येणे, बद्धकोष्ठता, शौचास त्रास होणे ही समस्या होऊ शकते.

यापूर्वी बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये ठसा उमटवलेला व आपल्या दमदार अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने सिनेरसिकांचे मन जिंकणारा अभिनेता इरफान खानला देखील कोलन कॅन्सर झाला होता. यंदा 29 एप्रिलला इरफान खानचे निधन झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: