आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी सोशल मीडिया एकवटला!
नाशिक, २८ ऑगस्ट
सत्ताधारी भाजपकडून नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. याला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असेल असे सध्याचे चित्र असले, तरी सर्वसामान्य नाशिककरांकडून मात्र सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांना पाठिंबा मिळताना दिसतो आहे. यांमध्ये विशेषत: तरूणांकडून चांगला पाठिंबा आहे व ते यासाठी माध्यमांचा वापर करत आहेत. #WeSupportMundhe, #NashikforMundhe असे मुंढेंच्या समर्थनार्थ विविध (जोडणी) हॅशटॅग वापरून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
ट्विटरवरील काही ट्विट्स मुढेंना नाशिककरांच्या किती व कसा पाठींबा आहे दिसून येत आहे.
@Dev_Fadnavis कार्यक्षम महापालिका आयुक्त मा. तुकाराम मुंढे साहेबांवर एका वर्षात तिसऱ्यादा बदलीसाठी दबाव आणला जातोय याचा अर्थ ती व्यक्ती सुयोग्य प्रशासन चालवत आहे….👍
त्यांच्या कार्याची दखल घ्यावी….👍#wesupportMundhe #nashikformundhe #NashikSupportsMundhe— उमेश विलास भानुशाली (@saiumesh398) August 28, 2018
#WeSupportMundhe #NashikforMundhe
वा नगरसेवकांनो वा!
प्रामाणिक आयुक्तांवर अविश्वास ठराव पहिल्यांदा आणून, रेकॉर्ड करताय? आम्ही नाशिककर बघतोय. निवडणुकीला भेटूच.@Tukaram_Indias pic.twitter.com/Q8hDMinV9l— Jitendra Bhave (@bhave_jitendra) August 28, 2018
नमस्कार मंडळी
आम्हाला तुमची साथ हवी आहे, हे नगरसेवक त्यांच्या फायद्यासाठी एकत्रित येऊन @Tukaram_Indias साहेबांना विरोध करत असतील तर आपण एक नागरिक म्हणून साहेबांना पाठिंबा देऊया हीच विनंती 🙏#मराठी #मव्यक्त व्हा खालील हॅशटॅग वर #wesupportMundhe #NashikforMundhe pic.twitter.com/zuh3tYdvHP
— Praveen Gavit 🎭 (@praveengavit10) August 27, 2018
मा आयुक्त तुकाराम मुंढे यांना वेळ दिला पाहिजे बर्याच प्रमाणात बदल दिसत आहे पण त्यांनी नगरसेवक यांचा मनमानीला कारभार बंद केला म्हणून हा अविश्वास ठराव @Dev_Fadnavis @Tukaram_Indias यांची नाशिक ला गरज आहे #SupportTukaramMundhe #nashikformundhe
— Swarup रहाणे (@swaruprahane88) August 28, 2018
अशिक्षित नगरसेवक एका प्रामाणिक पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या IAS अधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूध्द अविश्वास ठराव मांडतात,हेच आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीतील दुर्देव.#म #मराठी @MarathiBrain @TulsidasBhoite @VivekPatil_ @waglenikhil @ameytirodkar @Marathi_Rash pic.twitter.com/0kJv22Qmho
— 😎GADE-PATIL😎 (@sunny_gade) August 28, 2018
एकतर तुकाराम मुंढे यांची बदली करु नका आणि बदली करायचीच असेल तर त्यांना इतर ठिकाणी पाठवा. चार-सहा महिने त्यांनाही खमक्या अधिकारी मिळेल.कारण मग इथल्याही नगरसेवकांना ते नकोसे होतील. तो जो काही कालावधी ते येथे राहतील तेवढीच जरा तिथलीही साफसफाई.मग त्यांना आणखी कुठेतरी पाठवा!#म pic.twitter.com/izENMaw8r7
— Subhash Shelke (@SubhahShelke) August 28, 2018
तुकाराम मुंढे यांच्या सारखे अधिकारी या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे! अशा लोकांना फक्त भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोध होऊ शकतो!#iamtukarammundhe#supporttukarammundhe #म #मराठी
— हेमंत आठल्ये 🇮🇳 (@hemantathalye) August 28, 2018
#नाशिक म.न.पा आयुक्त "तुकाराम मुंढे" यांच्यावर अविश्वास प्रस्ताव म्हणजे दारुड्यानेच न पिलेल्याला 'किती पिऊन आलास' असं म्हणण्यातला प्रकार आहे.!#WeSupportMundhe #Nashik #NashikforMundhe #म #मराठी#महाराष्ट्र #Maharashtra #भाजपा pic.twitter.com/b0QjJrxyQo
— AmoL PatiL (@AmolPatil__) August 28, 2018
@Tukaram_Indias तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणू पाहणारे नगरसेवक पुढील निवडणुकीत मत मागायला येतील तेव्हा अविश्वास दाखवा!#नाशिक pic.twitter.com/Ps5dpj7Stm
— Rupesh Malu (@Rupesh_Malu) August 28, 2018
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात आता लबाडी चालणार नाही, तुकाराम मुंढे हलणार नाही.
मी एक नाशिककर …जागृत नाशिककर!#We_support_commissioner_Tukaram_Mundhe@Dev_Fadnavis— Pranjal @drpranjal9 (@drpranjal9) August 28, 2018
#NashikforMundhe @Dev_Fadnavis
आणि मी एकटाच नव्हे तर आम्ही सर्व #नाशिककर @Tukaram_Indias यांच्या बाजूने उभे आहोत. @CMOMaharashtra मुख्यमंत्री साहेब तुम्हीच या तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या बेबंदशाहीला लगाम लावू शकता.
नाशिकला मा. तुकाराम मुंढे सारखा प्रामाणिक आयुक्त हवा आहे.— Vivek Bachhav (@VivekBachhav) August 28, 2018
#STOP transfer of NMC commissioner Tukaram Munde…#IStandForHim Nashik… you?#WeWantMunde @CMOMaharashtra @Tukaram_Indias @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— Nashik News™ (@NashikNews) August 28, 2018
#WeSupportMundhe #NashikForMundhe pic.twitter.com/ihWTjGG6d0
— Jagbir Singh (@IJagbir_Singh) August 27, 2018
भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ,उत्तम व्यवस्थापक तुकाराम मुंढे यांना जाहीर पाठिंबा.@deshdoot @MataNashik#WeSupportMundhe #NashikForMundhe
— Swapnil Ghiya™ (@SwapnilGhiya) August 27, 2018
◆◆◆