“तालिबान म्हणजे सर्वसामान्य नागरिक” : इम्रान खान यांचा दावा!
वृत्तसंस्था । एएनआय
ब्रेनवृत्त । वॉशिंग्टन
तालिबान म्हणजे एखादी लष्करी संघटना नसून, ते सर्वसामान्य नागरिक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. देशाच्या सीमेवर ३० लाख निर्वासितांचा जत्था असताना पाकिस्तान तालिबानची शिकार कशी करणार याविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केले.
वाचा । पाकिस्तान अजूनही तसाच : इमन गंभीर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची एक मुलाखत पीबीएस न्यूजअवर (PBS NewsHour) वाहिनीवर नुकतीच प्रसारित झाली. या मुलाखतीत बोलताना इम्रान खान म्हणाले, की पाकिस्तानच्या सीमाभागात जवळपास ३० लाख अफगाणी निर्वासित वास्तव्यास असून, त्यांपैकी बहुतांश लोक पश्तुनी आहेत. हेच वांशिक गट तालिबान सैन्य म्हणून कार्य करते. पुढे त्यांनी असा दावा केला, की हे तालिबानी काही लष्कर सैनिक नसून, सामान्य नागरिकच आहेत.
“आता तिथे (पाकिस्तानी सीमेवर) ५ लाख लोकांचे समूह आहेत, काही ठिकाणी १ लाख लोकांचे समूह आहेत. आणि तालिबान म्हणजे काही लष्करी शाखा नसून, ते सामान्य नागरिक आहेत. आणि जर का निर्वासितांच्या शिबिरांमध्ये सामान्य नागरिक असतील, तर पाकिस्तान त्यांच्यावर कशी काय शिकार करू (ताब्यात घेऊ ) शकेल? तुम्ही त्यांना तालिबानचा आश्रयस्थान कसे म्हणू शकता?”, असे इम्रान खान म्हणाले.
हेही वाचा । दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यास अमेरिकेकडून ५० लक्ष डॉलर्सचे बक्षीस
तालिबानला पाकिस्तानात सुरक्षित आश्रय दिल्या जाण्याच्या संदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना खान म्हणाले, “कुठे आहेत हे सुरक्षित आश्रयस्थान (सेफ हेवन्स)? पाकिस्तानात तीस लाख निर्वासित वास्तव्यास आहेत आणि ते तालिबानी वांशिक समूहातील आहेत.” सोबतच, इम्रान म्हणाले, की सप्टेंबर, २००१ मध्ये न्यूयॉर्कमध्ये जे काही घडले त्याच्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसताना यूएसच्या अफगाणिस्तानमधील युद्धात हजारों पाकीस्तानी मारले गेले.
पाकिस्तान तालिबानला अफगाणीस्तान शासनाविरुद्ध लढण्यासाठी लष्करी, आर्थिक तसेच गुप्तचर विषयक सहकार्य करत असल्याचा आरोप पाकिस्तानवर कित्येक वर्षांपासून केला जात आहे. पण इम्रान खान यांनी या आरोपांचे खंडन करत हे “अतिशय अन्याय्य” असल्याचे म्हटले आहे.
Taliban are normal civilians, not military outfits, says Imran Khan
Read @ANI Story | https://t.co/Q0CThxQLyb#Taliban #ImranKhan pic.twitter.com/cNq2liyGuO
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2021
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) तयार केलेल्या एका अहवालानुसार, तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) जवळपास ६,००० दशतवादी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर कार्यरत गुप्तपणे कार्यरत आहेत. एकीकडे टीटीपीचे ‘विशिष्ट पाकिस्तान विरोधी उद्दिष्ट’ असले, तरी ते अफगाणिस्तानमध्ये अफगाणी सैन्याविरुद्ध लढण्यासाठी अफगाण तालिबानला सहकार्य करते, असे संयुक्त राष्ट्रांच्या विशिष्ट विश्लेषण गटाचे म्हणणे आहे.
आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.