‘नेचर इंडेक्स 2020’मध्ये भारतातील तीन संस्था पहिल्या ३०मध्ये !
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखालील 3 शैक्षणिक संस्थांनी ‘नेचर इंडेक्स 2020’मध्ये पहिल्या 30 मध्ये स्थान पटकावले आहे. या निर्देशांकात ‘इंडियन असोसिएशन फाँर द कल्टिव्हेशन आँफ सायन्स’ (IACS), कोलकाता 7व्या, जवाहरलाल नेहरू सेंटर फाँर अँडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च (JNCASR), बंगळुरू 14व्या आणि एस. एन. बोस नॅशनल सेंटर फाँर बेसिक सायन्सेस कोलकाता 30व्या स्थानावर आहे.
उत्तम दर्जाच्या पत्रिकांमधून प्रकाशित झालेले संशोधन आणि त्या संशोधनाच्या दर्जाची योग्यता या निकषांवर आधारीत ‘नेचर इंडेक्स 2020’ने केलल्या विद्यापीठे, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (IITs ), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISERs), विविध प्रयोगशाळा अशा उच्च दर्जाच्या 30 संस्थांच्या सर्वेक्षणात या वरील तीन भारतीय स्वायत्त संस्थांनी वरचे स्थान पटकाविले.
भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक-संशोधन परिषदेच्या समूहातील, असोसिएशन फाँर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (IACS), या संस्थेला उच्च दर्जाच्या रसायनशास्त्राच्या संशोधनात पहिल्या तीनात स्थान मिळाले आहे. जेएनसीएएसआरला (JNCASR) जैविक विज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थात चौथे, रसायन आणि भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या संस्थात दहावे, भारतीय शैक्षणिक संस्थांमधे दहावे, तर जागतिक क्रमवारीत 469वे स्थान लाभले आहे.
“उच्च श्रेणीच्या संशोधन पत्रिकांतून प्रसिध्द होणाऱ्या संशोधनाच्या दर्जावरून डिएसटीच्या शिक्षणाची केंद्रबिंदू झालेल्या या संस्थांना मिळालेले स्थान ही अतिशय उत्साहवर्धक घटना आहे. शैक्षणिक संस्था आणि प्रयोगशाळा यांमधून होणारे संशोधन यांनी संख्यात्मकदृष्टया चांगली कामगिरी केली असून, दर्जा सुधारण्यावर आणि रुपांतरीत करण्यावर गरज ओळखून भर दिल्याने हे शक्य झाले आहे”, असे डीएसटीचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा यावेळी म्हणाले.
जागतिक क्रमवारीच्या या यादीत भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद (CSIR) ही 39 संस्थांचा समूह असलेली संस्था 160व्या स्थानावर असून, भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू (IISc Bangalore) ही संस्था 184 व्या स्थानावर आहे.