निवडणूक पथकाद्वारे पर्वती मतदारसंघामध्ये सुमारे अडीच लाखांची रोकड जप्त

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

पुणे, ०६ ऑक्टोबर

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्वती मतदारसंघात स्थिर निवडणूक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्री सुमारे २ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली.

प्रातिनिधिक छायाचित्र

काल मध्यरात्री पर्वती मतदारसंघातील स्थिर पथक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सॅलिसबरी पार्कजवळील पुनावाला गार्डनजवळ नाकाबंदी केली होती. सदर नाकाबंदीत एका संशयास्पद मर्सिडीज बेंझ गाडीची चौकशी केल्यानंतर पथकाला सुमारे अडीच लाखांची रोकड सापडली. मोटारीच्या डिकीची तपासणी केल्यानंतर तब्बल २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड पथकाच्याहाती लागली आहे. संबंधित रक्कम वडगावशेरी येथील एका सलून व्यवसायिकाची असून, ती जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोदी सरकारचा ‘निवडणूक अर्थसंकल्प : डॉ. मनमोहन सिंग

दरम्यान, निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पर्वती मतदारसंघातील ही सलग तिसरी कारवाई असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे चार स्थिर व चार भरारी पथक नेमण्यात आले आहेत. यापूर्वी महर्षीनगर व अरण्येश्वर मधील संतनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

◆◆◆

आता पाठवा तुमच्या परिसरातील बातम्या आणि घडामोडींची माहिती थेट ई-मेलने. लिहाwriteto@marathibrain.com ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: