‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?
सर्वसामान्य उत्तेजक औषध गटातील ‘डेक्सामेथासोन’ (Dexamethasone) हे औषध ‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांवर प्रभावी असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी सिद्ध केले आहे. हे औषध आणि याविषयी संबंधित असलेल्या विविध बाबींची माहिती देणारं हे ‘ब्रेनबीट’.
ब्रेनबिट्स | डेक्सामेथासोन औषध
चीनमधून उगम पावलेल्या कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही ठराविक लस मिळालेली नाही. त्यासाठी भारतासह जगभरातील देश वेगवेगळ्या लसींवर संशोधन करत आहेत. मात्र कोरोना विषाणूवर अखेर प्रभावी ठरणारे एक औषध संशोधकांनी शोधून काढले आहे. ‘डेक्सामेथासोन’ (Dexamethasone) असे या औषधाचे नाव आहे. हे सर्वसामान्य उत्तेजक (Generic Steroid) प्रकारातील औषध आहे. या औषधाच्या वापराने ‘कोव्हिड-१९‘मुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठाने २,१०० कोरोना संक्रमित रुग्णांवर डेक्सामेथासोनची चाचणी केली. कोरोना विषाणू संक्रमित २,१०० रुग्णांना सुमारे १० दिवस ६ मिलीग्रॅमची मात्रा (Dose) देण्यात आला. कोरोनामुळे श्वासोच्छ्वास साधनावर (व्हेंटिलेटर) किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. तसेच, डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात, असे निदर्शनास आले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
ऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘कोव्हिड-१९’वरील लसीच्या मानवावर चाचण्या सुरू
● डेक्सामेथासोन काय आहे ?
‘डेक्सामेथासोन’ हे एक उत्तेजक संप्रेरक (Steroid Hormone) आहे. हे औषध शरीरात नैसर्गिकपणे दाह कमी करणाऱ्या संप्रेरकांची (Anti-Inflammatory Hormones) निर्मिती करते.
● हे औषध काम कसे करते?
हे औषध शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीरात होणाऱ्या दाहाला प्रतिकार करण्यास मदत करते. परंतु, काहीवेळा रोगप्रतिकारक शक्तीत वेगाने वाढ होते आणि ही प्रक्रिया प्राणघातक ठरू शकते. संसर्गावर आक्रमण करण्यासाठी तयार केलेली प्रक्रिया शरीराच्या स्वतःच्या पेशींवर आक्रमण करते. मात्र डेक्सामेथासोन हा प्रभाव शांत करते.
प्रातिनिधिक छायाचित्र
हे औषध केवळ रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरवर गंभीर आणि अत्यवस्थ स्थितीत असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. मात्र सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर हे औषध कार्य करत नाही.
● औषध किती प्रभावी आहे?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू रोखला जाऊ शकतो, तर ऑक्सिजनवर असणाऱ्या पाच रूग्णांपैकी एकाचा मृत्यू रोखू शकतो.
ब्रेनबिट्स : ‘आरोग्य सेतू’ची कार्यपद्धती, सक्तीकरणाची कारणे आणि बरंच काही!
● ‘जागतिक आरोग्य संघटने’ची प्रतिक्रिया
या औषधाचा वापर ऑक्सिजनवर असणाऱ्या ८० टक्के आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एक तृतीयांश रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यात फायदेशीर ठरत आहे. महत्वाचं म्हणजे हे औषधही कमी खर्चिक आहे. तथापि, सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर कोणताही फायदा दिसून आलेला नाही. मात्र हे औषध डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिले जावे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
हेही वाचा : ‘रेमडेसिवीर’ ठरले ‘कोव्हिड-१९’वरील एकमेव मान्यताप्राप्त औषध!
● औषध किती प्रमाणात उपलब्ध आहे?
‘डेक्सामेथासोन’ एक कमी किंमतीचे औषध आहे असून, याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या औषधाच्या चाचणीतून चांगला निकाल येण्याच्या अपेक्षेने अमेरिकेने दोन लाख लोकांवर उपचार करण्यासाठी आधीच पुरेसे औषध साठवले आहे. हे प्रथम १९५७ मध्ये तयार करण्यात आले असून, 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस युनायटेड किंगडममध्ये (UK) वापरासाठी उपलब्ध झाले.
● काही दुष्परिणाम आहेत का?
डेक्सामेथासोनच्या सेवनाने चिंता, झोप येणे, अडचण, वजन वाढणे, डोळ्यांचे विकार, अंधुक दृष्टी आणि रक्तस्राव आदि दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, कोरोना विषाणूच्या रूग्णांना तुलनेने कमी डोस आवश्यक आहे, ज्यामुळे त्याचे दुष्परिणामही मर्यादित असतील. इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले, या रुग्णांच्या लोकसंख्येमध्ये डेक्सामेथासोनच्या मात्रा वापरल्यामुळे कोणतेही जास्त नुकसान झाले नाही.