आता बीसीसीआय माहिती अधिकारांतर्गत

बीसीसीआय हे माहिती अधिकारांतर्गत काम करणार असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण कार्यान्वयन सुरू करण्याचे आदेश.

 

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर

भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) काम करणार असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने काल जाहीर केले आहे.

अनेक वर्षांपासून बीसीसीआयलाही माहिती अधिकाराअंतर्गत आणण्याची मागणी सुरू होती. या निर्णयानंतर आता बीसीसीआयलाही माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

बीसीसीआय देशातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारी राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वीकृत’ संस्था असून, त्यांचे देशातील क्रिकेटवर एकाधिपत्य आहे, असे केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आदेशात म्हटले आहे. आरटीआय तरतुदीनुसार माहितीसाठी अर्ज प्राप्त करण्यासाठी बीसीसीआयला १५ दिवसांच्या आत ऑनलाइन आणि ऑफलाइन तंत्रज्ञान तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

बीसीसीआयला या कायद्याअंतर्गत आणण्यासाठी सीआयसीने कायदा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, विधी आयोगाचा अहवाल तसेच युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांचा अहवाल पडताळून पाहिला. त्यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआयच्या कलम २(एच) ची पूर्तता करते, असे सीआयसीने म्हटले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: