१३ व्या शतकातील मंदिराला मिळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) तेलंगणा राज्यातील पालमपेट येथील मध्ययुगीन मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. १३ व्या शतकातील रामप्पा (रुद्रेश्वर) मंदिराला जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

देशाचे सांस्कृतिक व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी तेलंगणा राज्यातील रामप्पा (रुद्रेश्वर) मंदिराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याचे जाहीर केले. “हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, की युनेस्कोने तेलंगणाच्या पालमपेटमधील रामप्पा मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जाहीर केला आहे”, असे रेड्डी यांनी ट्विटले आहे.

वाचा । गडकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्यावर द्या : राज ठाकरे

जागतिक वारसा समितीच्या (World Heritage Committee) सद्या सुरु असलेल्या आभासी बैठकीत हा एकमताने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, समितीद्वारे रामप्पा मंदिराला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाला नॉर्वेने असहमती दर्शवली, पण रशियाचा विशेष प्रयत्नांनी अखेर हा दर्जा मंदिराला देण्याचे ठरले.  यासाठी १७ सदस्यांनी एकमताने सहमती दर्शवली.

विद्यमान जागतिक वारसा समितीत ऑस्ट्रेलिया, बेहरिन, बोस्निया व हरझेगोव्हिना, ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, गौतेमाला, हंगेरी, किर्गिझस्तान, माली, नायजेरिया, नौर्वे, ओमान, रशिया संघराज्य,  सेंट किट्स व नेव्हिस, सौदी अरेबिया, दक्षिण ऑफ्रिका, स्पेन, थायलंड आणि युगांडा या सदस्य देशांचा समावेश आहे.

हेही वाचा । ड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा व्हायला हवे : मुख्यमंत्री

⇒ रामप्पा  मंदिराबद्दल थोडक्यात : 

–  तेलंगणा राज्याच्या वारंगल जिल्ह्यातील पालमपेट येथे स्थित असलेले रामलिंगेश्वर मंदिर रामप्पा मंदिराच्या नावानेही ओळखले जाते. ह्या मंदिराच्या मुख्य शिल्पकाराच्या नावावरून या मंदिराचे नाव रामप्पा पडले. 

– शिल्पकारांच्या नावावरून प्रसिद्ध असलेल्या जगभरातील मोजक्याच मंदिरांपैकी हे एक आहे.

– तेलंगणा पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, हे मध्ययुगीन दख्खनी मंदिर इ.स. १२१३ मध्ये काकटीय राजा काकटी गणपती देवा यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आले आहे. गणपती देवाचा मुख्य सेनापती रुद्र समानी याच्या नेतृत्त्वात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

– या मंदिराच्या स्थापत्य आणि विस्तृत कोरोव कामांव्यतिरिक्त या मंदिराच्या भिंती, स्तंभ व छत हे अतिशय आकर्षक वैशिष्ट्ये आहते.

– हे मंदिर विटांनी बांधलेले असून, त्या इतक्या हलक्या आहेत, की त्या पाण्यावर सहज पोहू शकतात.

– मंदिराचा मुख्य भाग ‘शिखरा’ने मुकुटासारखा वरून आच्छादित आहे, तर सभोवताली प्रदक्षिणा पथ आहे. 

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: