सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या १० पैकी ६ राज्यांत भाजपची सत्ता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशात बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढतच चालले असून, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या १० राज्यांपैकी ६ राज्यांत भाजपची सत्ता आहे. सेन्टर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने १० राज्यांच्या बेरोजगारीबद्दल प्रकाशित केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था परीक्षण केंद्र या संस्थेने देशातील १० राज्यांत असलेल्या वाढत चाललेल्या युवकांच्या बेरोजगारीसंबंधी नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार त्रिपुरा राज्यात सर्वाधिक युवक बरोजगार आहेत. दुसरीकडे, या १० राज्यांपैकी ६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहेत. यांपैकी, अहवालात प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तरप्रदेश या सर्वाधिक बेरोजगारी आहे. या राज्यांमध्ये एकूण बेरोजगारीचे प्रमाण ३१.२ टक्के इतके आहे.
हरियाणामध्ये २०.३ टक्के, दिल्लीमध्ये २० टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये १५.३ टक्के, पंजाबमध्ये ११.१ टक्के, तर झारखंडमध्ये १०.९ टक्के बेरोजगारी आहे. तर, जी राज्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर मानली जातात अशा बिहारमध्ये १०.३ टक्के, छत्तीसगडमध्ये ८.6 टक्के, तर उत्तरप्रदेशात ८.२ टक्के बरोजगारी आहे. अहवालात प्रकाशित आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये ३.३ टक्के, तर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमी, म्हणजे १.८ टक्के युवक बेरोजगार आहेत.
दरम्यान, हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या निवडणूकीचे वारे सुरू आहेत व दोन्ही राज्यांच्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यांच्या बेरोजगारीच्या अकडेवारीकडे बघता, महाराष्ट्रात ५.७ टक्के, तर हरियाणात २०. 3 टक्के युवक बेरोजगारी आहे.
◆◆◆