मंत्रालयातून निघाला ६५० ट्रक कचरा !

राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयात केल्या गेलेल्या नुतनीकरणाच्यावेळी तब्बल ६५० ट्रक कचरा बाहेर निघाला होता. ही बाब काल विधानपरिषदेत उघडकीस आली. 

 

वृत्तसंस्था,

मुंबई, ३० नोव्हेंबर

राज्याच्या मंत्रालयातील नूतनीकरणाचे काम करताना तब्बल ६५० ट्रक कचरा निघाला असल्याची आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांच्या सुचनेच्या संदर्भात ही माहिती काल विधानपरिषदेत उघड झाली.

राज्यच्या विधानसभा निवडणुकींनंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यावेळी काही मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. या नूतनीकरणाच्या विषयावरूनच काल एक धक्कादायक बाब विधानपरिषदेत उघडकीस आली. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या या नूतनीकरणाच्याच्या वेळी मंत्र्यांच्या दालनांतून तब्बल ६५० ट्रक एवढा कचरा काढण्यात आला असल्याची बाब काल समोर आली आहे.

‘नूतनीकरणाच्याच्या वेळी मंत्र्यांच्या दालनांतून तब्बल ६५० ट्रक एवढा कचरा काढण्यात आला होता आणि तो वाहून नेण्यासाठी एकूण ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते’, असा आरोप काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी राज्य शासनावर काल विधानपरिषदेत केला आहे. गाडगीळ पुढे म्हणाले, ‘याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारही करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेशही निघाले होते, मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही.’

कांग्रेस आमदाराच्या या आरोपाला उत्तर देताना, याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केली आहे. ‘नाशिकच्या मुख्य अभियंत्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यांचा अहवाल पुढील एका महिन्यात सादर होईल. जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे पोटे म्हणाले.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: