दोनदा ‘सेना पदका’ने सन्मानित होते हुतात्मा कर्नल शर्मा !

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताच्या २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह चार सैनिक व जम्मू-कश्मीर पोलिस दलाचे उपनिरीक्षक शकील काझी हुतात्मा झाले.

 

ब्रेनवृत्त, ३ मे

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह एकूण पाच भारतीय सैनिक आज शनिवारी हुतात्मा झाले. पहाटे 3.30 वाजता झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार केले. हुतात्मा झालेल्या इतर चार सैनिकांमध्ये मेजर अनुज सूद, नाईक राजेश, लान्स नाईक दिनेश आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे.

दरम्यान, याआधी 3 एप्रिल 2020  रोजी हंदवाडा आणि सोपोरमध्ये झालेल्या स्वतंत्र कारवाईत चार दहशतवादी आणि त्यांच्या पाच समर्थकांना अटक करण्यात आली होती. या यशानंतर कर्नल शर्मा यांनी आपल्या तुकडीतील सैनिकांना प्रोत्साहन दिले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “हे युनिटच माझे घर आहे. माझे सर्व सहकारी जवान घरचे सदस्य आहेत.

दरम्यान, याआधी 3 एप्रिल 2020  रोजी हंदवाडा आणि सोपोरमध्ये झालेल्या स्वतंत्र कारवाईत चार दहशतवादी आणि त्यांच्या पाच समर्थकांना अटक करण्यात आली होती. या यशानंतर कर्नल शर्मा यांनी आपल्या तुकडीतील सैनिकांना प्रोत्साहन दिले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “हे युनिटच माझे घर आहे. माझे सर्व सहकारी जवान घरचे सदस्य आहेत.”

एएनआयच्या वृत्तानुसार, कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ते बऱ्याच काळापासून काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात होते. अनेक दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी आघाडीवर राहून नेतृत्व केले होते. दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल कर्नल आशुतोष शर्मा यांना दोन वेळा ‘सेना पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, जम्मू-काश्मीर पोलिसातील पोलीस उपनिरीक्षक शकील काजी हे देखील या चकमकीत मृत्युमुखी पडले. या सैनिकांच्या हुतात्मा होण्यावरून देशभरातून हळहळ आणि श्रध्दांजली व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हंदवाडा इथं देशासाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या धैर्यवान सैनिकांना आदरांजली. त्यांचं शौर्य आणि त्याग देश विसरणार नाही. देशसेवेसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं. नागरिकांच्या रक्षणासाठी त्यांनी अविरत योगदान दिलं. योद्धांच्या कुटुंबीयांच्या, मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहोत” अशा भावना व्यक्त केल्या.

शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव -भाग १

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या सैनिक आणि पोलिसांना श्रद्धाजंली अर्पण केली. “सैनिक आणि सुरक्षारक्षकांच्या मृत्यूमुळं प्रचंड दु:ख झालंय. या सगळ्यांनीच दहशतवादाविरोधात लढाई लढून शौर्य दाखवलंय. देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलंय. त्यांचं शौर्य आम्ही कधीच विसरणार नाही,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मागील पाच वर्षात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना हुतात्मा झालेले कर्नल रँकचे ते पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल एमएन राय आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले होते.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: