‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली

हवामान बदल, मान्सून पावसाचा लहरीपणा, अनेक नैसगिर्क संकटे आणि शेतीयोग्य जमिनीचे कमी होत जाणारी उपलब्धता, अशा विविध बाबी बघता ‘ऍक्वापोनिक्स शेती प्रणाली’ ही आधुनिक शेती  तंत्रज्ञानाचीच देण आहे. चला याविषयी जाणून घेऊया आपल्या मराठी भाषेतून. 

 

ब्रेनविशेष | अनुराधा धावडे

भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. आपल्या देशात विविध पद्धतीने शेती करून उत्पादने घेतली जातात. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायही अनेक शेतकऱ्यांनी सुरु केले आहेत. भारतामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुकुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन सारखे व्यवसाय केले जातात. मात्र, अलीकडच्या काळात बदलते हवामान आणि मान्सूनी पावसाचा लहरीपणा यामुळे देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळाच असतो, तर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती असते.

अलीकडे, या हवामान बदलाच्या आणि अर्थव्यवस्थांच्या संक्रमण काळात जगातील अनेक ठिकाणी शेतीसंबंधीचे नवनवे प्रयोग आणि प्रणालींचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, अमेरिका आणि इस्त्रायलसारख्या देशांमध्ये एका अनोख्या पद्धतीने शेती केली जाते. ती पद्धत तुम्हाला माहित आहे का? या प्रणालीचे नाव आहे ‘ऍक्वापोनिक्स’ (Aquaponics) (पाण्यात वाढणारी वनस्पती) शेती प्रणाली! कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेन्टो शहरामध्ये गोड्या पाण्यामध्ये स्थानिक जातीचे मासे पालनासोबतच ‘लेट्यूस’ (Lettuce) भाज्यांचे ॲक्वापोनिक्स पद्धतीने उत्पादन घेतले जात आहे. तसेच, उत्तर भारतातही ‘मासे आणि माती’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ‘सेंद्रिय शेती‘ (Organic Farming) केली जात आहे. त्याचबरोबर, अलीकडे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकातील बंगळूरूमध्येही ही प्रणाली वापरून शेती उत्पादनाला सुरुवात झाली आहे.

‘मोती कोहेन’ हे इस्त्राईलमध्ये पहिले ‘ऍक्वापोनिक्स’ फार्म विकसित करण्यासाठी ओळखले जातात. संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न व कृषी संघटने’त (FAO : Food and Agriculture Organization) विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. कोहेन यांनी जॉर्डनसह शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनाही आपल्या काही नव्या तंत्रज्ञानांची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी आयर्लंड आणि इटलीमधील सल्लागारांसह मिळून ‘एफएओ’साठी ऍक्वापोनिक्स विषयी माहिती पुस्तकही लिहिले आहे. याच ‘ऍक्वापोनिक्स‘ विषयी आपण इथे जाणून घेऊया.

● ‘ऍक्वापोनिक्स शेती प्रणाली’ म्हणजे काय

ऍक्वापोनिक्स‘ शेती प्रणालीमध्ये मासे आणि माती यांच्या परस्पर सहयोगातून पालेभाज्या, फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या प्रणालीमध्ये मासे आणि वनस्पती एकाच वातावरणात एकाच वेळी वाढू शकतात. माशांची विष्ठा वनस्पतींना सेंद्रिय अन्न पुरवते, जे पाण्याचे शुद्धीकरण करतात आणि त्यामुळे संतुलित ‘परिसंस्था’ (Ecosystem) तयार होते. तसेच यांतील सूक्ष्मजीव किंवा नत्रीकरणकारक जिवाणू (नायट्रीफाईंग बॅक्टेरिया) माशांच्या विष्ठेत असलेल्या अमोनियाला नायट्रेट्समध्ये रुपांतरित करतात, जे वनस्पती वाढीसाठी पोषक असतात.

हेही वाचा : सेंद्रिय शेती काळाची गरज!

● कशी केली जाते ‘ऍक्वापोनिक्स‘ शेती ?

आकृती : ऍक्वापोनिक्स शेती प्रणाली

छायाचित्र स्रोत : hightechgardening.com

या प्रणालीत एक नैसर्गिक किंवा कृत्रिम तलाव, गोड्या पाण्याचे तलाव किंवा समुद्राच्या पाण्यात योग्य तंत्रज्ञान आणि उपकरणांची आवश्यकता असते. या प्रकारच्या शेतीत, मासे आणि मोलुस्क यांचे कृत्रिम प्रजनन आणि साठवण यांद्वारे जलचर प्राण्यांचा विकास केला जातो. जलचर, समान प्रजातींचे प्राणी, त्यांचे मांस किंवा उप-उत्पादांचे उत्पादन ही शेती मोठ्या प्रमाणात सक्षम करण्यास व विकसित मदत करते. ‘मासेमारी’ हे याचे उत्तम उदाहरण आहे.

कृषी परिवर्तनासाठी केंद्रीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

ऍक्वापोनिक्स शेती प्रणालीचे फायदे

– उच्च उत्पादन (20-25% जास्त) आणि गुणात्मक उत्पादन.
– वाळवंट, खारट, वालुकामय, बर्फाच्छादित जमीन यांसारख्या शेती नसलेली जमीन या शेतीसाठी वापरली जाऊ शकते.
– दोन्ही, वनस्पती आणि मासे वापर आणि उत्पन्नासाठी वापरले जाऊ शकतात.

ऍक्वापोनिक्स शेतीच्या मर्यादा

– सुरुवातीची किंमत, तसेच माती उत्पादन इतर पद्धती किंवा हायड्रोपोनिक्सच्या तुलनेत महाग आहे.
– यासाठी मासे, जीवाणू आणि वनस्पती यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– यासाठी अनुकूल तापमान (17–34℃) असणे आवश्यक आहे.
तसेच, या शेती पद्धतीचा अवलंब करताना एखाद्या लहानशा चुकीने किंवा अपघाताने संपूर्ण यंत्रणा नष्ट होऊ शकते.

 

◆◆◆

प्रस्तुत लेखाविषयी तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया रकान्यात नक्की कळवा किंवा आम्हाला मेल करा.

अशीच विविधांगी माहिती आणि विश्लेषणात्मक बातम्या थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: