रामदेवबाबा साधूंना म्हणाले ‘चिलम ओढणे सोडा!’

0
25

एएनआय

प्रयागराज, ३१ जानेवारी

प्रयागराज (अलाहाबाद) येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात उपस्थित साधू-संतांना ‘चिलम ओढणे’ (धूम्रपान) थांबवण्याची विनंती योगगुरू रामदेवबाबा यांनी केली आहे.

‘आपण राम आणि कृष्णाचे अनुयायी आहोत. त्यांनी जर धूम्रपान केलं नाही, तर मग आपण का करावे?’, असा सवाल करत योगगुरू रामदेवबाबा यांनी कुंभमेळ्यातील साधुसंतांना चिलम ओढणे थांबवण्याची विनंती केली आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात ते साधुसंतांशी संवाद साधत होते. साधूंना चिलम ओढण्यास मनाई करत ते असेही म्हणाले की, “एका महान ध्येयासाठी आपण घर, कुटुंब, आईवडील असं सर्व काही सोडून आहोत. मग आपण धूम्रपान का सोडू नये?”

रामदेवबाबांनी साधुसंतांकडून सापडलेले चिलम जमा केले आणि त्यांना चिलम फुंकणे थांबवण्याची विनंती केली. जमा केलेले चिलम ते भविष्यात बनविण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयात ठेवणार असल्याचेही रामदेवबाबांनी म्हटले आहे. “मी तरुणांना विडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडण्यास प्रवृत्त केले आहे, मग महात्मांनी ते का सोडू नये?” असा सवालही त्यांनी केला आहे.

प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा हा एकूण ५५ दिवस चालणार असून ४ मार्चली त्याची सांगता होणार आहे. आयुष्यात हातून झालेल्या चुकांपासून मुक्ती मिळावी व सर्व पाप गंगा नदीच्या पाण्यात धुवून निघावेत या श्रद्धेने जगभरातील श्रद्धाळू या मेळ्यात सहभागी होत असतात.

 

◆◆◆

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here