जगभरातील कंपन्या घेणार ₹१०० अब्जाहून अधिकचे कर्ज!

चालू आर्थिक वर्षात जगभरातील अनेक आस्थापने सुमारे १ ट्रिलीयन डॉलर्सहून (₹१०० अब्ज) अधिकचे नवीन कर्ज घेतील, असा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

 

ब्रेनवृत्त | लंडन 

कोव्हिड-१९‘ साथीने जगभर हाहाकार माजवलेला असून, जगभरातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडलेल्या आहेत, तर अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. यामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी व झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक उद्योगांना, तसेचा अर्थव्यवस्थांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी, चालू आर्थिक वर्षात जगभरातील अनेक आस्थापने सुमारे १ ट्रिलीयन डॉलर्सहून (₹१०० अब्ज) अधिकचे नवीन कर्ज घेतील, असा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

लंडनमधील एका संस्थेने जगभरातील ९०० प्रमुख आस्थापनांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात या आस्थापनांना त्यांच्या व्यवसायाबद्दल व संबंधित अडचणींबद्दल विचारणा करण्यात आली होती. या सर्वेक्षणावर आधारित अहवालानुसार, यंदा जगभरातील अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. जगभरातील उद्योगधंदे सुमारे १ ट्रिलीयन डॉरलर्सचे, अर्थात १०० अब्ज रुपयांचे (₹१०,००,००,००,००,०००) कर्ज काढतील असा अंदाज आहे. त्यामुळे जगभरातील कंपन्यांवर असलेल्या कर्जाचे भार ९.३ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक !

● कर्जामध्ये होणार १२ टक्क्यांनी वाढ

चालू वर्षात जर या कंपन्या १ ट्रिलीयन डॉरलर्सचे कर्ज उचलतील, तर मागील वर्षाच्या तुलनेत कंपन्यांच्या कर्जामध्ये तब्बल १२ टक्के वाढ होण्याचे भाकीत या अहवालातून वर्तवण्यात आले आहे. तसेच, जगभरातील कंपन्यांवर होणाऱ्या कर्जाची आकडेवारी ही एखाद्या मध्यम आकाराच्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी समांतर असेल.

दरम्यान, मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय संस्थांचे विविध आस्थापनांना कर्ज देण्याचे काम थांबले आहे. त्यामुळे, अनेक देशांनी त्यांच्या देशातील कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी विविध योजना आखण्याचे ठरवले आहे. युरोप, अमेरिका तसेच जपानने आपल्याकडील उद्योगांना मदत देण्यासाठी खास योजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. भारतातही स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ची अंमलबजावणी केली जात आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्प २०२०-२१ : प्राप्तिकर दरांत मोठी कपात

● मागील वर्षी कर्जामध्ये ८ टक्के वाढ

मागीलवर्षी जागतिक पातळीवर विविध कंपन्या आणि आस्थापना यांचे विलीनीकरण आणि एकत्रिकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जाची उलथापालथ झाली. परिणामी, मागील वर्षी कंपन्यांच्या कर्जामध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. शिवाय, कंपन्यांनी केलेली शेअर्सची फेरखरेदी व शेअर्सवर दिलेला लाभांश यासाठीही कंपन्यांना कर्ज घ्यावे लागले होते. तसेच, मागील पाच वर्षांत अमेरिकी कंपन्यांवरील कर्ज सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विकसित देशातील कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन आपले व्यवहार चालवावे लागत आहेत. स्वित्झर्लंड या देशाचा अपवादवगळता अन्य सर्वच देशांमधील कंपन्यांना अधिकाधिक कर्ज घ्यावे लागत असलेले दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: