कोरोनाचं कोडं उलगडलं?
ब्रेनसाहित्य | लेख
कोरोना विषाणू आजार (कोव्हिड-१९) हे जगाला पडलेलं एक अनाकलनीय कोडे आहे. या आजारामुळे सर्व जग भयभीत आहे, परंतु मला १००% असे वाटत आहे, की हे कोडे मला सुटले आहे. माझ्या घरामध्ये सप्टेंबर, २०२० मध्ये कोरोना विषाणू येऊन गेला. त्यात आमच्यातील दहापैकी नऊ व्यक्तींना कोव्हिड-१९ची लागण झाली होती, परंतु मला काही लागण झाली नाही. माझा मानसशास्त्र (सायकॉलॉजी) या विषयाचा अभ्यास आहे, त्यामुळे मी त्या दिवसांमध्ये कोरोना होतो कसा? याची साखळी लांबते कशी? तो थांबवायचं असेल, तर काय करावे लागेल? याविषयी विचार करत होतो. नंतर या प्रश्नांची उत्तरे मला हळूहळू सापडत गेली.
जसा न्यूटनला सफरचंद खाली पडल्यावर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, तसे मला माझ्या घरात कोरोना आल्यानंतर कोरोना विषाणू आजाराचा बोध झाला. तर तो कसा? हे मला प्रश्नोत्तराच्या स्वरुपात चांगल्याप्रकारे मांडता येईल, म्हणून हा एक लहानसा प्रयत्न मी करत आहे.
वाचा 👉 “मी कोरोनातली नवरी बोलतेय“
● आपलं ब्रेनवॉश झालं आहे का? झालं असेल, तर ते कसं?
मीडियातून किंवा शेजारीपाजारी यांकडून आपल्याला एखादी बाब सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी अव्याहतपणे ऐकविली जाते, दाखवली जाते. त्यामुळे आपली काँसीएस थिंकींग थांबवली जाते व आपण सबकाँसीएसली त्या गोष्टी खऱ्या समजून वागू लागतो. ज्याप्रकारे पाटी पुसल्याशिवाय आपण त्या पाटीवर पुन्हा लिहू शकत नाही, तसं आपल्यात प्रेम, भावना, माणुसकी हे पूर्ण असल्याशिवाय कोरोना साखळी थांबत नाही.
● कोरोनाची जी साखळी आहे, ती सायकॉलॉजी ट्रीटमेंट आहे का?
कोरोना साखळी ही सायकॉलॉजी ट्रीटमेंट आहे. ती कशी? आपण पाहूया. ज्या वेळेस कोरोना विषाणू चीनमध्ये आढळला, तेव्हा तेथील व्हिडिओ आपल्याकडील टीव्ही चैनलवर वारंवार दाखवले जाऊ लागले. तेथील प्रशासन लोकांना रस्त्यावरून उचलून नेऊ लागले, काही लोकांच्या घरांना वेल्डिंग करून त्यांना आतमधेच बंद करू लागले. काही लोकांना अक्षरशः बॉयलरमध्ये टाकण्याचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यावर, म्हणजे जगभर दाखवू लागले. डोळ्यांना न दिसणारा विषाणू मुद्दाम अक्राळविक्राळ दाखवला जात होता.
अशी जी वागणूक दिली जाते, त्यामुळे प्रत्येकाला वाटत होते, की मला कोरोनाचा आजार नको व्हायला. इतर कोणालाही होवो, पण मला नको! आपल्यातील प्रेम, भावना, माणुसकी ही मिटून टाकली होती.
तसे पाहता चीन आपली कोणतीच गोष्ट सार्वजनिक स्वरुपात प्रसारित करत नाही, जगाला समजू देत नाही. दुसरीकडे, संपूर्ण जग काय करते हे त्यांना माहिती होते, परंतु चीन काय करत असतो हे जगाला माहित होत नाही. परंतु अशी मुद्दामहून सायकॉलॉजी ट्रीटमेंट पूर्ण जगाला देण्यासाठी अशा विविध व्हिडिओतून भीती पसरवली गेली.
● कोव्हिड-१९ची साखळी कशी तयार होते?
कोरोना विषाणूचा आजार किती घातक आहे! या आजाराने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, की समाजात आपलं नाव असावे, आपल्याला सर्वांनी चांगले म्हणावे. तो कितीही निर्दयी वागत असला, तरी लोकांकडून त्याला शेठ-साहेब असेच वागवणे तो अपेक्षित करतो. परंतु कोरोना झाल्यावर आज समाजात मिळणारी वागणूक बदलली आहे. कोरोना झालेल्या लोकांच्या घराकडे वाळीत टाकल्यासारखे बघणे, आज आपल्या शेजारी कोण पॉझिटिव्ह सापडले आहे का हे मोबाईलमध्ये बघणे अशी समाजाची वृत्ती झाली आहे.
शासनसुद्धा कोरोना बाधित लोकांच्या घरांना बोर्ड लावते, की आपल्याला या व्यक्तींपासून सावध राहायला पाहिजे. खरंतर, अशी वागणूक कुणालाच नको असते, त्यामुळे १४ दिवसांत बरा होणारा आजार प्रत्येकालाच नको असतो. आज ९०% व्यक्ती मला कोरोना नाही व्हायला पाहिजे अशी समजूत बाळगून असतात, तर फक्त १०% व्यक्ती मान्य करतात, की संपूर्ण जगात कोरोना आहे, मग मला झाला तर नवल काय? “मी डॉक्टरांकडे (कोव्हीड सेंटर) जाईल, १४ दिवस कोव्हीड सेंटरला व घरच्यांपासून विलगीकरणात राहुन बरे होईल”, ही पॉझिटिव्हिटी आहे, परंतु ती फक्त दहा टक्के लोकांमध्येच आहे.
कोव्हिड-१९ उगमाच्या पुनर्तपासाला चीनचा नकार!
● आता ही साखळी लांबते कशी?
कोव्हिड-१९ हा आजार सर्वांनाच नको असतो, अशा आजाराची व्यक्तीला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून कोरोनाची लागण होते. हे त्या व्यक्तीला लगेच कळते. ताप, सर्दी, खोकला व इतर लक्षणे दर वेळेपेक्षा वेगळी असलेली व्यक्ती मग खाजगी डॉक्टरकडे जाते, पण कोरोनाची तपासणी करत नाही. त्या व्यक्तीला माहीत असते, की तपासणी केल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह येणारच. मग तो/ती घरीच थांबते व आपली कामे तशीच करायचा प्रयत्न करते. याबाबत घरच्यांनासुद्धा सांगत नाही. नंतर ती व्यक्ती असा विचार करते, की आपण जर आपल्या दररोजच्या कामावर नाही गेलो, तर इतरांना वाटणार की मी पॉझिटिव्ह आहे म्हणून, ती व्यक्ती दररोज कामावर जाते, मित्र-मंडळीमध्ये बसते व दररोजच्यासारखे व्यवहार करते. समोरच्याने आपल्याला ओळखले की काय या भावनेने त्याला चिकटण्याचा, म्हणजेच स्वतःला कोव्हिड-१९ निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते. आठ-नऊ दिवस अशा पद्धतीने काढल्यावर प्रथम स्वतःचे घर व नंतर मित्र व नातेवाईकांमध्ये कोरोनाची लागण होते. मग त्यांचीही परिस्थिती याप्रमाणेच होऊन कोव्हिड-१९ साखळी लांबतच जाते.
● कोरोना प्रसारात मीडियाचा वापर कसा होतो?
– मीडियाने सर्वप्रथम आपला ब्रेन वॉश केला. आपल्या मनातील इतरांच्या विषयीच्या प्रेम, भावना, माणुसकी, पुसून टाकली गेली
– सर्वांत आधी डोळ्यांनी न दिसणाऱ्या विषाणूला अक्राळविक्राळ दाखवले आणि सर्वांचा ब्रेन वॉश केला.
– आपल्या सीमेवर चीनचे वारंवार हस्तक्षेप वाढत आहेत. यामुळे युद्ध होते की काय या परिस्थितीचे भीतीचे वातावरण पसरत होते.
– कोंबड्यांमध्ये असा विषाणू सापडला आहे, की तो कोरोनापेक्षा दहापट लोकसंख्या मारणार, असा दावा ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ मायकल ग्रेगर यांनी केला आहे.
– एक महाकाय दगड/उल्कापिंड पृथ्वीजवळ येतोय, तो कधीही पृथ्वीला धडकू शकतो.
– कोरोना विषाणू हवेतून पसरतो डब्ल्यूएचओचा दावा.
– काही चॅनेल संध्याकाळी वर्ल्ड वॉर होणार असे सांगून त्यासंबंधीचे कार्यक्रम दररोज चालवू लागले.
– चीनमध्ये माकडामधून मंकी वायरस आला. त्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा.
– युट्युबवर फेक न्युज चैनल तयार झालेत व त्यांनी हजारो फेक बातम्या युट्युबवर टाकल्या आहेत. फक्त भीती पसरवण्यासाठी, लोकांचे ब्रेनवॉश करण्यासाठी ‘भीती वाढवली की कोरोना वाढला’ हे सूत्र आहे
उदा. चीनने लॉन्गमार्च नावाने रॉकेट अंतराळात सोडले. त्यानंतर काही तासातच चीनकडून बातमी आली, की पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत गेल्यानंतर आमचा त्यावरील ताबा सुटला आहे व ते पृथ्वीवर केव्हाही पडू शकते. ती मिसाईल अमेरिकेत पडेल अशी बातमी पसरवली असती, तर अमेरिकेत कोरोनाची लाट चालू झाली असती. जे रुग्ण डॉक्टरकडे जाणार होते, ते रुग्ण डॉक्टरकडे न जाता समाजात वावरत राहून कोरोना वाढला असता. ह्या बातमीमुळे नंतर जगात दुसरी लाट वाढली होती.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला ही बातमी देखील जगात तिसरा लाट घेवून येवू शकते. मिडियाद्वारे आज ह्याच बातम्या वारंवार दाखवून भीती निर्माण केली जात आहे.
● कोरोनाला आपण कसं थांबवू शकतो?
कोरोना झाला म्हणजे नवल नाही. संपूर्ण जगात कोव्हिड-१९ आहे. मी डॉक्टरकडे जाईल, कोव्हीड सेंटरला राहील, १४ दिवसात बरा होऊन घरी येईल अशी पॉझिव्हटि ठेवली तर कोरोना झाल्यावर जी विकृती होते, ती विकृती होणार नाही. या विकृतीत मुले बापाला व बाप मुलाला ओळखत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही. कोव्हिड-१९ नव्हता त्याआधी लोकं एकमेकांना भेटत होती. कुणी आजारी पडलं तर ते त्यांना भेटून आधार देत होते. आधाराचे दोन शब्द त्यांचा अर्धा आजार कमी करत होते, मात्र लोक आज याउलट वाळीत टाकल्यासारखे वागणूक देतात. ज्या घरात कोरोना विषाणूची लागण झाली असते, त्या घरातली चार-पाच व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असतात व इतर व्यक्ती त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यावेळेस ह्या व्यक्तींना एक आधाराचा शब्द अथवा एक फोन त्या व्यक्तींना दहा हत्तीचे बळ देत असतो आजारातून बरी होण्यास मदत मिळत असते अशीच पॉझिटिव्हिटी तुम्ही देत राहिलात तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव होणार हे नक्की व साखळी तोडली जाणार
● स्वतःचा ब्रेन वॉश स्वतः करावा म्हणजे काय?
मीडिया, जाहिरात, न्यूज चैनल्स आपला सर्वांचा ब्रेनवॉश करत असतात. आपण यापासून थोडे अंतर बाळगुन राहायचं, वारंवार पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा व दुसऱ्यालाही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
● क्राईसने कोणता सिद्धांत सांगितला आहे?
जे मिटायला तयार आहे, ते वाचलं जाणार आणि जे वाचायचा प्रयत्न करणार, ते मीटवले जाणार हा सिद्धांत क्राईसने सांगितला आहे. सर्वजण कोरोना नको म्हणून प्रयत्न करून कोरोनाची लांबच लांब साखळी तयार करत आहेत. कोरोना स्वीकारला तर कोरोना साखळी लांबणार नाही
● सर्वात मोठा व्हेरिएंट कोणता?
शास्त्रज्ञांनी कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट शोधून काढलेत. त्यामध्ये अल्फा, ग्यामा, बीटा,डेल्टा, डेटा प्लस इत्यादी शोधून काढले आहेत. डेटा प्लसने तिसरी लाट येणार असे सांगितले जाते, परंतु हे सर्व खोटी भीती पसरवणारे आहे. मानसिक विकृतीतुन ८०% कोरोना पसरवला जातो आणि सर्व व्हेरीयंट मिळून २०% कोरोना विषाणू आजार पसरवला जातो. म्हणजे एकूणच मानसिक विकृती ही सर्वांचा बाप आहे, हा बापच थांबवायला पाहिजे.
हेही वाचा 👉 शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अल्फा, बिटाशी लढण्यात असमर्थ!
● कोरोना झाल्यावर १४ दिवस लक्षणे दिसत नाही, हे खरे आहे का?
कोरोना विषाणूची लागण झाल्यावर व्यक्तीला ताप, सर्दी व खोकला ही लक्षणे तात्काळ दिसतात. काहींमध्ये ती अल्प प्रमाणात असतात. कित्येक वेळा चौदा दिवस लक्षणे समजत नाही असे भासवले जाते, म्हणजे दहा-बारा दिवस अंगावर काढत ती व्यक्ती समाजात वावरत राहते व कोरोना पसरतो.
संत कबीर यांचा एक दोहा आहे, “मनसे हारे हार है, मनसे जीते जीत” (मनातून खचलात तर हरलात, मनातून जिंकलात तर खरंच जिंकलात). म्हणजे नेमकं काय?
कोरोना विषाणूची प्रत्येकाला लागण होऊ शकते हे सत्य आहे, पण कोणालाच कोरोना नको आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यावर वागणूक चांगल्या दर्जाची दिली जात नाही, त्याला मनातून हरवून टाकले जाते. कोरोना झाला म्हणजे सर्व काही संपले असे त्याला वाटते, त्यामुळे हा दुवा इथे कमी पडतो.
मला माझ्या घरात कोरोना आल्यामुळे व मी एक सायकॉलॉजिस्ट म्हणजे दुसऱ्याच्या मनातील ओळखण्यात पटाईत असल्यामुळे आज या सिद्धांतावर येऊन पोहोचलो आहे, की आपण जर या लोकांमध्ये पाहिल्यासारखे प्रेम भावना, माणुसकीची वागणूक ह्या सर्व गोष्टी टाकले, तर आपण कमीत कमी दिवसांत कोरोनावर मात करू. असे केल्याने तिसरी लाट येणार नाही ही मला खात्री आहे. आपण शिवरायांचे मावळे आहोत, तरी आपण लढवय्ये होऊन पूर्ण जगाला या संकटातून वाचवायचं नव आव्हान आपल्या समोर आहे, ते आपण पूर्ण करू.
लेख – सुनील गावडे
मु. भराडी, आंबेगाव, जि.पुणे
भ्र. क्र. ९७३०४८७२३०
(लेखक मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
(प्रस्तुत लेखात प्रकाशित विचार हे पूर्णतः लेखकाचे असून, मराठी ब्रेन व संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)
सहभागी व्हा @marathibrainin
विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.